उद्धव ठाकरे यांना फेल करण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रयत्न- चंद्रकांत पाटील

मुंबई | सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे राज्य सरकारवर विरोधी पक्ष टीका करत आहे.

आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यावर टीका केली आहे. ते एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अपयशी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील सहयोगी पक्ष करत असल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच महाविकास आघाडी स्थापन झाली असून, आता राज्य सरकारमध्ये त्यांचेच ऐकले जात नाही, असा दावाही पाटलांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अपयशी करण्यासाठी महाविकास आघाडीचे सहयोगी पक्ष प्रयत्न करत आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

तसेच महाविकास आघाडी सरकार शरद पवार यांच्यामुळेच स्थापन झाले आहे. त्यांनी सरकारचे कान पकडून सांगायला पाहिजे, मात्र या सरकारमध्ये त्यांचेच ऐकले जात नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूरच्या वारीच्या धोरणावरही टीका केली आहे. सरकारने आधी पादुका हेलिकॉप्टरने नेणार असे सांगितले, मात्र नंतर बसने पादुका नेतात. त्याचे भाडेही आकारले जाते.

सरकारचे नेमके चालले काय आहे? असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला प्रश्न केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.