Share

‘भिकारी समजून मत द्या’, काँग्रेस उमेदवाराची मतदारांना अजब मागणी

congress-mla

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जवळ येत आहेत. त्या अनुषंगाने उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक सरस शक्कल लढवत आहेत. नुकताच उत्तराखंडमधील(Uttarkhand) तेहरी गढवाल जिल्ह्यातून एक अजब घटना समोर आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस(Congress) पक्षाचा उमेदवार लोकांच्या घरासमोर जाऊन भिकारी समजून तरी मतदान करा, अशी विनवणी करत आहे.(congress mla participant dhanilal shah statement)

या काँग्रेस उमेदवाराच्या अनोख्या प्रचाराची चर्चा देशभरात होत आहे. या काँग्रेस उमेदवारांचे नाव धनीलाल शाह(Dhanilal Shah) असे आहे. हा उमेदवार तेहरी गढवाल जिल्ह्यातील घणसाली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी काँग्रेस उमेदवार धनीलाल शाह लोकांच्या घरी जाऊन मत देण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत.

यावेळी काँग्रेस उमेदवार धनीलाल शाह लोकांकडे भीक समजून मला मत द्या, अशी अजब मागणी मतदारांकडे करत आहेत. उमेदवार धनीलाल शाह घरोघरी जाऊन लोकांना सांगत आहेत की, “मला तुमच्याकडून पूर्ण आशा आहे की, यावेळी तुम्ही मला नक्कीच विधानसभेत पाठवाल. जर तुम्ही मला मत देऊ शकत नसाल तर मी हरल्यावर माझ्या पार्थिवावर एक-एक लाकूड टाकायला नक्की या.”

काँग्रेस उमेदवार धनीलाल शाह लोकांना भावनिक साद घालून मत मागत आहेत. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या ७० जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकांची मतमोजणी १० मार्चला होणार आहे. उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ २३ मार्च २०२२ रोजी संपत आहे. येथे काँग्रेससह भाजप, आम आदमी पार्टी, बसपा आणि अनेक छोटे पक्ष आपले नशीब आजमावणार आहेत.

उत्तराखंडची निवडणूक भाजप पक्षासाठी सर्वात आव्हानात्मक राहिली आहे. दोन दशकांपासून दर पाच वर्षांनी उत्तराखंडमध्ये सत्ता बदलण्याची परंपरा आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल, अशी पक्षाच्या नेत्यांना आशा आहे. उत्तराखंडमधील सत्ता परिवर्तनाचे हे मिथक मोडीत काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

उत्तराखंडमधील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ५७ जागा जिंकून प्रचंड बहुमताने आपले सरकार स्थापन केले होते. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ११ जागा मिळाल्या. त्यानंतर त्रिवेंद्रसिंग रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाले होते. पण ४ वर्षांनी त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आले. त्यांच्या जागी तीरथसिंग रावत यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. काही महिन्यांतच तीरथ सिंह रावत यांच्या जागी पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनवण्यात आले.

महत्वाच्या बातम्या :-
इमारतीला धडकून झाला ३४ पक्ष्यांचा मृत्यु, धक्कादायक व्हिडिओ आला समोर
पुण्यात जबर राडा..! शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पडले पायरीवर, व्हिडिओ तूफान व्हायरल
मोठा खुलासा! विराट कोहली आणि अनिल कुंबळेमध्ये ‘या’ गोष्टीवरून झाला होता प्रचंड वाद

राजकारण

Join WhatsApp

Join Now