‘प्रत्येक महिन्याला ६०० लोकांना अयोध्येच्या यात्रेला घेऊन जाणार’, काँग्रेस आमदाराची अनोखी घोषणा

काँग्रेसच्या एका आमदाराने आपल्या विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीने रामलल्लाचे दर्शन घेतले पाहिजे, अशी घोषणा केली आहे. मध्य प्रदेशातील इंदोर-१ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार ‘संजय शुक्ला’ यांनी सांगितले की, विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डमधून महिला आणि पुरुषांची एक टीम अयोध्या यात्रेवर पाठवली जाईल.

या विधानसभा मतदारसंघात दर महिन्याला अयोध्या दर्शन मोहीम राबविण्यात येणार आहे. काँग्रेसचे आमदार संजय शुक्ला म्हणाले की, ‘मी प्रत्येक वॉर्डमधील नागरिकांना महिन्याला अयोध्येला घेऊन जाणार आहे. येथून ६०० यात्रेकरूंची पहिली तुकडी १८ डिसेंबर रोजी ट्रेनने प्रभू रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येकडे रवाना होणार आहे.

शुक्ला यांनी असेही सांगितले की, प्रत्येकजण लहानपणापासून रामायण वाचतात आणि ऐकतात. भगवान रामाच्या जीवनाची संपूर्ण कथा आपण सर्वांना परिचित आहे. त्याचे नाट्यरूपांतर सर्वांनी दूरदर्शनवर रामायण मालिकेच्या रूपाने पाहिले आहे.

अशा स्थितीत प्रभू राम जन्मभूमी असलेल्या अयोध्येला भेट द्यावी आणि मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांच्या जन्मस्थानी पोहोचून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत, अशी देशातील प्रत्येक नागरिकाची इच्छा असते. काँग्रेस आमदार म्हणाले की, विधानसभा मतदारसंघात एकूण १७ वॉर्ड आहेत.

यापैकी एका वॉर्डमधील नागरिकांना दर महिन्याला अयोध्येला यात्रेसाठी पाठवले जाणार आहे. १८ डिसेंबरपासून हे अयोध्या दर्शन अभियान सुरू होत आहे. या दिवशी विधानसभा मतदार संघ क्रमांक एक अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक ९ मधील ६०० नागरिकांची तुकडी अयोध्येकडे रवाना होणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.