‘राम मंदिरासाठी मिळालेल्या दानातून भाजपचे नेते दारू ढोसतात’

मुंबई | अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम ५ ऑगस्ट २०२० रोजी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. राम मंदिरासाठी भाजपने देशभरातून निधी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. अशातच माजी केंद्रीय मंत्री आणि झाबुआ येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार कांतिलाल भूरिया यांनी राम मंदिरावरून वादग्रस्त विधान केले आहे.

भाजप नेते राम मंदिराच्या नावाने निधी गोळा करतात आणि संध्याकाळी त्या पैशातून दारू ढोसतात, असे वादग्रस्त विधान कांतिलाल भूरिया यांनी केले आहे. भूरिया यांनी केलेल्या या विधानावर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मध्यप्रदेशातील पेटलावद येथे एका धरणे आंदोलनादरम्यान कांतिलाल भूरिया यांनी हे विधान केले आहे. भूरिया हे दोनदा केंद्रीय मंत्री, पाच वेळा खासदार राहिलेले आहेत. सध्या ते आमदार आहेत.

तसेच राम मंदिराच्या प्रत्यक्ष निर्माण कार्यास देखील सुरुवात झाली आहे. तर, मंदिर उभं करण्यासाठी लागणार खर्च हा करोडो रामभक्तांमार्फत संकलित केला जात आहे. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर निर्माण सहयोग अभियान सुरु केले आहे. भाजपने देखील निधी संकलनासाठी सक्रिय सहभाग घेतला जात असून देशभरात हे अभियान राबविले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या
मनसेमधील आऊटगोईंग थांबेना! बड्या नेत्याने केला भाजपात प्रवेश
शिवसेनेच्या ढाण्या वाघाची दिल्लीत डरकाळी; संजय राऊत पोहचले गाझीपूर बॉर्डरवर
लोकल सेवेच्या वेळापत्रकात होणार बदल? राजेश टोपेंनी केली मोठी घोषणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.