Share

पांढरे केस, आधाराला काठी; एकेकाळी देशाचे राजकारण गाजवणारे सुरेश कलमाडी आता काय करतात?

काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सुरेश कलमाडी वृद्ध अवस्थेत दिसत आहेत. या फोटोमध्ये सुरेश कलमाडी(Suresh Kalmadi) यांच्या हातामध्ये चालण्यासाठी लागणारी काठी देखील दिसत आहे. त्यामुळे एकेकाळी राजकारण गाजवणारा नेता आता थकला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. (congress leader suresh kalmadi photo viral )

सुरेश कलमाडी यांचा जन्म १ मे १९४४ रोजी झाला होता. सुरेश कलमाडी यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९६० साली सुरेश कलमाडी यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश घेतला.

१९६४ मध्ये सुरेश कलमाडी हवाई दलाचे प्रशिक्षण घेण्यासाठी जोधपूरमधील फ्लाइंग कॉलेजमध्ये दाखल झाले होते. १९५४ ते १९७२ या सहा वर्षांच्या कालावधीत सुरेश कलमाडी यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली आहे. त्यानंतर १९७८ मध्ये सुरेश कलमाडी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

१९८२ मध्ये वयाच्या ३८ व्या वर्षी सुरेश कलमाडी यांनी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. त्यानंतर सलग ३० वर्षे सुरेश कलमाडी खासदार होते. भारताचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात सुरेश कलमाडी रेल्वे मंत्री म्हणून कार्यरत होते. २०१० सालापासून सुरेश कलमाडी यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा सुरु झाली.

२०१० साली कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा प्रकरणात सुरेश कलमाडी यांच्यावर आरोप करण्यात आले होते. यावेळी विरोधकांनी सुरेश कलमाडी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणात सुरेश कलमाडी यांना ९ महिने तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. २०१४ साली काँग्रेस पक्षाकडून सुरेश कलमाडी यांना खासदारकीचे तिकीट नाकारण्यात आलं होती.

त्यांनतर सुरेश कलमाडी यांनी राजकारणातून काढता पाय घेतला. सुरेश कलमाडी हे नाव राष्ट्रीय राजकारणामधून अचानक गायब झाले. नुकताच सुरेश कलमाडी यांचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये सुरेश कलमाडी यांच्या डोक्यावर पांढरे केस दिसत आहेत. सुरेश कलमाडी यांचे वय सध्या ७८ वर्षे आहे. या फोटोमध्ये सुरेश कलमाडी यांच्या हातामध्ये चालण्यासाठी लागणारी काठी देखील दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
काँग्रेसने दिली चड्ड्या जाळण्याची धमकी, RSS ने काँग्रेसला पाठवली अंतर्वस्त्रे, वाचा नेमका वाद काय?
OTT वर आहेत ‘या’ पाच सगळ्यात बोल्ड फिल्म्स, चुकूनही कोणासमोर पाहण्याची करू नका चूक
क्रिकेटच्या सरावासाठी आईने रोज १३ किमी सायकल चालवली, आता मुलगा भारताकडून खेळणार

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now