ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण सध्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे चर्चेत आहे. वाराणसीतील(Varanasi) ज्ञानवापी मशिद प्रकरणात हिंदू पक्षाने शिवलिंग मिळाल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी मशिद संकुलाचा तो भाग सील करण्याचे निर्देश दिले आहेत.(congress leader statement on gyanvapi masjid viral video)
या दाव्यादरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कथित शिवलिंग दिसत आहे. यामुळे हिंदू पक्षाचे वकील आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणानंतर हिंदू पक्षाच्या वकिलांनी ते शिवलिंग असल्याचा दावा केला आहे.
पण या प्रकरणात अद्याप न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यादरम्यान आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाळुखान्यात शिवलिंग म्हणून जी गोष्ट सांगितली जात आहे ती वस्तुत: वाळूखान्याचा कारंजा आहे, अशी माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक वाळुखाना साफ करताना दिसत आहेत.
https://twitter.com/afzal_zulekha/status/1526230455917285376?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1526230455917285376%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmulukhmaidan.com%2Fgyanvapi-masjid-new-video-viral-on-social-media%2F
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूखाना साफ करतानाचा हा व्हिडिओ १६ मे पूर्वीचा आहे. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाशी या व्हिडिओचा काहीही संबंध नसल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणावर अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष शाहनवाज आलम यांनी माहिती दिली आहे. “हे शिवलिंग नसून कारंज्याच्या मधोमध तुटलेला दगड आहे”, असे अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष शाहनवाज आलम यांनी सांगितले आहे.
अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष शाहनवाज आलम पुढे म्हणाले की, “मशिदीमध्ये वुधू करण्यासाठी असलेल्या जुन्या कारंज्याच्या मध्यभागी असलेला दगड फार पूर्वी तुटला होता, जो आता शिवलिंग असल्याचे सांगत अफवा पसरवली जात आहे. देशातील जवळपास सर्व जुन्या आणि मोठ्या मशिदींमध्ये असे कारंजे आहेत त्यांच्यामध्ये असेच दगड बसवले आहेत.”
ज्ञानवापी मशीद प्रकरणात हिंदू पक्षाचे वकील प्रशांत उमराव यांनी आणखी एक दावा केला आहे. ज्ञानवापी मशीदीमधील मोकळा झालेला वाळूखाना पुन्हा भरण्यात आल्याचे हिंदू पक्षाचे वकील प्रशांत उमराव यांनी सांगितले आहे. यावरून हिंदू पक्षाचे वकील प्रशांत उमराव यांनी वाराणसीचे डीएम कौशल राज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
मथुरेतील ज्ञानवापी मशिदीत सापडलेले शिवलिंग नेमके आहे तरी कसे? पहा व्हिडिओ
राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण करणे भाजप नेत्यांना पडले महागात; पोलिसांची कठोर ॲक्शन
पुण्यातील शिवसेनेच्या बड्या नेत्याचा राजीनामा; हिंदुत्वाचा विसर पडला म्हणत थेट उद्धव ठाकरेंना केलं लक्ष्य