Shivsena : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला खिंडार पडले होते. मात्र, आता शिवसेनेत विविध पक्षांचे नेते प्रवेश करत आहेत. आणखी एका नेत्याने शिवबंधन बांधल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे.
आता थेट काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षांनीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. औरंगाबाद येथील काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन तायडे यांनी यांनी शिवबंधन बांधले आहे.
सचिन तायडे हे गेल्या चार वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सचिन तायडे यांना शिवबंधन बांधले आहे. तसेच नुकताच बीड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले सुनील धांडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.
त्यामुळे मराठवाड्यात उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. सुनील धांडे यांनी याआधी दोनदा शिवसेना सोडली होती. शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे असा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास राहिला आहे. त्यानंतर आता ते परत शिवसेनेत आले आहेत.
आगामी निवणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला आपली ताकद वाढवणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आपली पक्षसंघटना वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात आता या दोन नेत्यांच्या प्रवेशाचा शिवसेनेला फायदाच होणार आहे.
तसेच महाविकास आघाडीने आपली युती कायम ठेवत पुढील निवडणूका सोबत लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन तायडे हे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील एका पक्षातील नेत्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्यात अंतर्गत वाद निर्माण होईल का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
Shinde Group : शिंदे गटातील बड्या मंत्र्याचा भ्रष्टाचार आला समोर; जावयाच्या माध्यमातून झाला मोठा घोटाळा
Sanjay Shirsat : मंत्रीपद नाकारल्यानंतर संजय शिरसाटांना पुन्हा धक्का; एकनाथ शिंदेंनी पुन्हा डावललं
Sharad Pawar: …म्हणून वेदांता फाॅक्सकाॅनचा प्रकल्प गुजरातला गेला; शरद पवारांनी सांगीतले खरे कारण
Asad Rauf : क्रिकेटचे पंच असद रऊफ यांचा भयानक शेवट; शेवटच्या दिवसातील अवस्था वाचून येईल डोळ्यात पाणी