Share

गाढवावर मुख्यमंत्र्याचा फोटो लावणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक; धक्कादायक कारण आले समोर

तेलंगणाच्या करीमनगरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे एका काँग्रेस नेते आणि नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (NSUI) चे अध्यक्ष बालमूरी व्यंकट नरसिंगराव यांना गाढव चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना गुरुवारी रात्री हुजुराबाद शहरातून अटक केली. (congress leader balmuri vyankatrao arrested)

टीआरएस नेत्यांच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काँग्रेस नेत्यावर तेच गाढव चोरल्याचा आरोप आहे, ज्याचा वापर त्यांनी अलीकडेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या विरोधात एका छोट्याशा आंदोलनात केला होता.

पोलिसांनी सांगितले की, जम्मीकुंता येथील रहिवासी तंगुतुरी राजकुमार यांनी गाढवांच्या चोरीचा आरोप करत सात जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सरकारी नोकऱ्या नसल्याबद्दल बालमुरी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करत होते आणि त्यांनी चंद्रशेखर राव यांचा फोटो गाढवावर लावला होता. आता टीआरएस नेत्यांनी यावर आक्षेप घेत पोलिसांशी संपर्क साधला, त्यानंतर व्यंकट बालमूरीला गाढवाच्या चोरीप्रकरणी अटक करण्यात आली.

तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी म्हणाले की, विद्यार्थी नेत्याला रात्री अटक करणे चुकीचे आहे. रेड्डी यांनी या घटनेचा संबंध बेरोजगारीशी देखील जोडला. तसेच त्यांनी सांगितले की, विद्यार्थी नेत्यांना रोजगाराच्या विरोधात आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे.

बालमूरीवर बेकायदेशीरपणे एकत्र येण्यास प्रवृत्त करणे, दंगल करणे, चोरी करणे आणि प्राण्यांवर क्रूरता दाखविण्याच्या उद्देशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम १४३, १५३, ५०४, ३७९ सोबत आयटी कायद्याच्या कलम १४९, ६७ आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० च्या कलम ११ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

एफआयआरनंतर बालमुरीने सांगितले की, त्याने गाढव भाडे देऊन विकत घेतले होते. तर पोलिसांचे म्हणणे आहे की त्याने गाढव चोरले आहे. तक्रारीत अन्य सहा जणांचीही नावे आहेत, मात्र ते फरार आहेत. करीमनगर येथील सातवाहन विद्यापीठात निदर्शने केल्यानंतर बालमूरी व्यंकटला अटक करण्यात आली. तो आणि इतर आरोपी राज्यात सरकारी नोकऱ्या मिळत नसल्यामुळे आंदोलन करत होते.

महत्वाच्या बातम्या-
नवऱ्यानं सोडलं, सासऱ्यासोबतच हलाला, नंतर लागली रांगच रांग; पीडित महिलेचा व्हिडिओ व्हायरल
पोतंभर नाणी घेऊन स्कुटर घेण्यासाठी पोहोचला, सुट्टे पैसे मोजून कर्मचाऱ्यांना फुटला घाम, वाचा पुढं काय घडलं..
किडनीच्या मोबदल्यात चार कोटी रुपयांचे अमिष दाखवत गायिकेने मोलकरणीला गंडवले

राजकारण

Join WhatsApp

Join Now