आघाडीत बिघाडी: आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशावरून नाराज काँग्रेस राज्यपालांकडे जाणार

मुंबई : राज्यात भाजपाला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

मुंबई महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या शिवसेनेवर टीका करण्याची संधी काँग्रेस सोडत नाही, विविध मुद्द्यावरून काँग्रेस नेते शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. अशातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी घटनाबाह्य आर्थिक तरतूद केली असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

काँग्रेस नेते जर्नादन चांदूरकर यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले की, ‘आदित्य ठाकरे यांनी शहरातील ४३ शिवसेनेच्या नगरसेवकांसाठी ३ हजार ६९३ कोटी रुपये ब्युटीफिकेशनसाठी डीपीडीसीच्या फंडातून काम करण्यासाठी दिले आहेत. हा आदेश मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला असून पुढील कार्यवाहीसाठी म्हाडाकडे गेली आहे.’

‘मुंबईत पैसे आले त्याचा आनंद आहे, परंतु येणाऱ्या BMC च्या निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेच्या ४३ नगरसेवकांच्या मतदारसंघात ब्युटिफिकेशनचं असं काम DPDC च्या इतिहासात पहिल्यांदाच मंजूर करण्यात आलं आहे. ही बाब घटनाबाह्य आहे असे चांदूरकर यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, यासाठी अर्थसंकल्पात आधीपासून काही व्यवस्था केल्याचे आणि ती तरतूद विधीमंडळातून मंजूर करुन घेतल्याचेही दिसत नाही. या निधीसाठी आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना स्वतंत्रपणे एक प्रस्ताव आणावा लागेल. हा प्रस्ताव ज्यावेळी येईल त्यावेळी सभागृहात अजित पवारांचीच पंचाईत होईल.

याचबरोबर आदित्य ठाकरेंच्या कृतीचे समर्थन करणे अजित पवारांसाठी कठीण जाईल, असे जनार्दन चांदुरकर म्हणाले. या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालावे अशी मागणी जनार्दन चांदुरकरांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या 

गोविंदाला हिट गाण्याच्या नादात जेलमध्ये खडी फोडावी लागणार होती पण….

दिपाली चव्हाण यांच्या बदलीसाठी मविआच्या नेत्याने पैसे उकळले? भाजपाचा गंभीर आरोप

अरे वा! कोरोनाची लस टोचून घ्या आणि सोन्याची नथ घेऊन जा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.