काँग्रेसनेच केला शिवसेनेवर ८०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

मुंबई : सध्या राज्यात राजकीय वातावरण फारच तणावपूर्ण आहे. एकीकडे विविध घटनांवरून सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील सतत धुसफूस चव्हाट्यावर येत आहे.

आता राज्यातील महाविकास आघाडीमध्ये असलेल्या सहकारी काँग्रेस पक्षानेच शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेत ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

“मालमत्ता कराच्या वसुलीत महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ७०० ते ८०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. मालमत्तांच्या ‘मापात पाप’ करुन अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केला आहे. एकट्या वरळीतच असा १०० कोटी रुपयांचा घोटाळा असेल”, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.

तसेच ‘वरळी येथील मालमत्तेचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळाऐवजी केवळ दहा टक्क्यांपर्यंतच दाखवून कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर वसुल करण्याच्या जागी केवळ लाखाचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला. अनेक गिरण्यांच्या भुखंडाबाबतही असाचा घोटाळा करण्यात आला.’

हा प्रकार फक्त वरळीपुरता मर्यादित नसून संपूर्ण मुंबईत असाच प्रकार सुरु आहे. अशाप्रकारे तब्बल ७०० ते ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा दावा रवी राजा यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

केवळ मतांसाठी! मतदारांचे कपडे धुतोय उमेदवार, अन् देतोय ‘हे’ आश्वासन

ट्रोलर म्हणाला ‘तू ऐश्वर्याच्या लायकीचा नाहीस’; अभिषेक बच्चनने दिले ‘हे’ उत्तर

राजकारणात धुमाकूळ घालणारे बंटी आणि बबली कोण? माज़ी पोलीस अधिकाऱ्याने केले खळबळजनक आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.