Share

”१ हजारांच सिलेंडर अन् २००च्या तेलावर शिजवलेल्या फुकट रेशनची मजा वेगळीच असेल ना?” काँग्रेस नेत्याचा मोदींना टोला

narendra modi

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी(PM Modi) यांनी शनिवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पण एकीकडे इंधनाचे दर वाढत आहेत. याच मुद्द्याला लक्ष करत विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.(congress ex mla alka lamba tweet about modi government)

केंद्र सरकाराने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत वाढवली आहे. ही योजना ३१ मार्चला संपुष्टात येणार होती. पण आता शनिवारी झालेल्या बैठकीत या योजनेची मुदत वाढविली आहे. दुसरीकडे इंधनाचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. यावरून काँग्रेस नेत्या आणि माजी आमदार अलका लांबा यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

“पेट्रोल ९० रुपये लिटर, त्यावर १००० रुपयांचा गॅस सिलेंडर घ्या. मग २०० रुपये लिटर तेल खरेदी करा आणि घरी आल्यानंतर मोफत मिळालेले धान्य शिजवून ते खाण्याची मजा काही औरच असेल, नाही का?”, असा सवाल काँग्रेस नेत्या आणि माजी आमदार अलका लांबा यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी मोदी सरकाराच्या धोरणांवर टीका केली आहे.

https://twitter.com/LambaAlka/status/1508333745643827201?s=20&t=qi0x832Ss4wNSXmwgkiKiQ

केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना लॉकडाउनच्या काळात सुरु केली होती. याकरिता केंद्र सरकारने तब्बल १.७० हजार कोटींच्या निधीची तरतूद केली होती. या योजनेचा लाभ देशभरातील अनेक गरीब कुटुंबांनी घेतला. या योजनेअंतर्गत गरीब कुटूंबाला प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत धान्य मिळते. आता या योजनेची मुदत वाढवण्यात आली आहे.

त्याचा फायदा देशभरातील अनेक गरीब कुटूंबाना मिळणार आहे. पण दुसरीकडे इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. सहा महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. पण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. तसेच सिलेंडरच्या दरामध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे.

यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर भाजपने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करून जनतेला महागाईची भेट दिली आहे”, अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली होती. यावेळी नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर देखील टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या :-
विजू माने- कुशल बद्रिकेची जोडी बॉक्स ऑफिसवर पुन्हा घालणार धिंगाणा; VIDEO शेअर करत दिले नव्या चित्रपटाचे संकेत
जे 75 वर्षात जमलं नाही ते करून दाखवलं; पंजाबमध्ये ‘आप’चा आणखी एक धडाकेबाज निर्णय; वाचून कराल कौतुक
..म्हणून मला भारतीय पाकिस्तानात जा असं म्हणतात, बॉलिवूडच्या खानने व्यक्त केले दु:ख

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now