कंगना मागणार का शेतकऱ्यांची माफी? काँग्रेस नेत्यांची धमकी; ‘शेतकऱ्यांची माफी माग नाहीतर…’

मुंबई | कृषी कायदे रद्द् करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारविरोधात शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. यानंतर कंगनाने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून संबोधले. यानंतर कंगनावर सध्या सर्व स्तरांमधून टीका होत आहे.

याचाच धागा पकडत मध्य प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे सचिव मनोज आर्य आणि ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नेकराम यादव यांनी कंगनाला सुनावले आहे. ‘शेतकऱ्यांची माफी माग. नाहीतर तुझ्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण होऊ देणार नाही’, अशी धमकी त्यांनी दिली आहे.

याबाबत ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. आगामी कंगनाच्या ‘धाकड’ या चित्रपटाचं मध्य प्रदेशमध्ये चित्रीकरण सुरु आहे. याच काळात तिने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटले होते. त्यामुळे तिने शेतकऱ्यांची माफी न मागितल्यास हे चित्रीकरण बंद करु अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे.

“हिंसाचाराचं समर्थन करणारा प्रत्येक भारतीय दहशतवादीच”
कंगनाने शेतकऱ्यांवर टीका करताना म्हंटले होते की, “आज शेतकऱ्यांनी दिल्लीत हिंसाचार घडवून आणला त्या हिंसाचाराला ज्या प्रत्येक भारतीयाने सपोर्ट केला आहे ते सर्व दहशतवादी आहेत. त्यामध्ये त्या देशविरोधी ब्रँडचाही समावेश आहे”, असे तिने म्हंटले होते.

महत्त्वाच्या बातम्या
भाजपाचा इशारा; ‘शिवजयंती उत्साहात साजरी करू द्यावी, अन्यथा…’
यंदा शिवजयंती साधेपणाने होणार साजरी; वाचा कुठले नियम पाळावे लागतील?
‘शरद पवारांसारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याने आहिल्याबाईंच्या पुतळ्याला हात लावू नये म्हणून…’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.