मोदींच्या ‘त्या’ जुन्या ट्विटवरून काँग्रेसने मोदींना घेरलं

दिल्ली | काँग्रेसने मोदींना त्यांच्या जुन्या ट्विटवरून घेरलं आहे. २०१३ मध्ये मोदींनी एक ट्विट केलं होतं. त्याला आता काँग्रेसने सवाल केला आहे.

पंतप्रधान मोदी तुमच्या या शब्दांना काय महत्व आहे का? असा सवाल काँग्रेसने मोदींना केला आहे. २०१३ ला मोदींनी भारतीय सैन्याच्या मागे हटण्यापासून प्रश्न उपस्थित केला होता.

आता सध्याला गलवान खोऱ्यात चीनी सैन्य मागे हटल्यानंतर आपल्या भारतीय सैनिकांनीही माघार घेतल्याचे चित्र दिसत आहे. यावरून काँग्रेसने मोदींनी त्यांच्या जुन्या ट्विटवरून घेरले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी २०१३ मध्ये चीनच्या संदर्भात मोदींनी केलेल्या ट्विटवरून त्यांना कोंडीत पकडले आहे. देशाला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत असं आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी २०१३ मध्ये त्यावेळेस च्या सरकारला सैन्य मागे हटले म्हणून प्रश्न केला होता. त्यामुळे सध्याची परिस्थिती बघता सुरजेवाला यांनी मोदींना प्रश्न केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.