Share

काँग्रेसने दिली चड्ड्या जाळण्याची धमकी, RSS ने काँग्रेसला पाठवली अंतर्वस्त्रे, वाचा नेमका वाद काय?

राजकीय पक्षांतील नेते एकमेकांवर नेहमीच आरोप-प्रत्यारोप करत असतात. कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस(Congress) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शाब्दिक वाद सुरु आहे. या वादामध्ये सध्या आक्षेपार्ह शब्दांमध्ये एकमेकांवर टीका केली जात आहे. कर्नाटकमध्येकाँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकमेकांवर अंतर्वस्त्रावरून टीका करत आहेत. (congress and rss fight conterversy )

काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले होते. यावेळी कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांच्या निवासस्थानाबाहेर नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी खाकी चड्डी जाळली होती. या सर्व प्रकरणावर कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते सिद्धरमय्या यांनी प्रतिक्रिया दिली होती.

“नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी पोलिसांसमोर चड्डी जाळली. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निषेध करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी चड्डी जाळणार आहोत”, असे वक्तव्य कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते सिद्धरमय्या यांनी केले होते. सिद्धरमय्या यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यालयात पाठवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अंतर्वस्त्रे गोळा करण्यात येत आहेत.

काँग्रेसचे नेते सिद्धरमय्या यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, “सिद्धरमय्या आणि काँग्रेसची चड्डी यापूर्वीच सैल झाली आहे. सिद्धरमय्या आणि काँग्रेसची यांची चड्डी फाडली आहे. त्यामुळेच त्यांनी ती जाळली आहे. उत्तर प्रदेशमध्ये त्यांची चड्डी हरवली होती”, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी पुढे म्हणाले की, “सिद्धरमय्या यांची चड्डी आणि लुंगी चामुंडेश्वर या ठिकाणी हरवली आहे. म्हणून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चड्डी जाळण्याचा प्रयत्न करत आहेत”, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसचे नेते सिद्धरमय्या यांच्यावर टीका केली आहे. भाजपचे नेते नारायणस्वामी यांनी देखील सिद्धरमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

“जर काँग्रेसचे नेते सिद्धरमय्या यांना चड्डी जाळायची असेल तर आपल्या घरात जाळा. मी सर्व जिल्हाप्रमुखांना सिद्धरमय्या यांना चड्डी पाठवण्याचे आवाहन केले आहे. सिद्धरमय्या यांना चड्डी जाळल्यामुळे प्रदूषण होत आहे. त्यामुळे त्यांनी चड्डी जाळण्यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घ्यावी. सिद्धरमय्या या पातळीवर जातील असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. त्यामुळे आम्ही आता काँग्रेस कार्यालयात अंतर्वस्त्रे गोळा करून पाठवली आहेत”, असे भाजप नेते नारायणस्वामी यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
क्रिकेटच्या सरावासाठी आईने रोज १३ किमी सायकल चालवली, आता मुलगा भारताकडून खेळणार
फेसबूक फ्रेंड दलित आहे कळताच मुलीने त्याला केली मारहाण, नंतर विष देऊन केली हत्या
तु बच्चा है बच्चे की तरह.., सिराजने रियान पराग आणि हर्षल पटेलच्या भांडणात लावली होती आग

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now