बापरे! अचानक सापडला सोन्याचा डोंगर; सोनं लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी, पहा व्हिडीओ

काँगो | सोनं एक मौल्यवान धातू आहे. भारत आणि जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी सोन्याला खुप महत्व आहे. भारतीय लोकांना सोन्याबद्दल प्रचंड आकर्षण आहे. सोन्याचे दर थोडे घसरले तरी लोक सोनं खरेदीसाठी गर्दी करतात. पण जर सोनं मोफत मिळालं तर लोक काय करतील? हेच आफ्रिकेच्या काँगोमध्ये पाहायला मिळाले आहे. याठिकाणी चक्क सोन्याचा डोंगर सापडला आहे.

काँगो देशाच्या अनेक भागात सोनं सापडते. सध्या सोशल मीडियावर काँगो येथील डोंगर खोदण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मध्य आफ्रिकेच्या काँगोमध्ये एक डोंगर सापडला आहे. या डोंगरामध्ये ६० ते ९० टक्के सोने असल्याचे सांगितले जात आहे.

काँगो देशातील किवू याठिकाणी हा डोंगर आहे. तिथे सोनं सापडत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत अनेक लोक सोनं खोदकाम करून काढताना दिसत आहेत. दरम्यान काँगोमध्ये सोनं सापडणे नवी गोष्ट नाही. याठिकाणी सोन्याच्या अनेक खाणी आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार या देशातून सोन्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.

दरम्यान, सोन्याची खाण असणे ही त्याठिकाणी सामान्य बाब आहे. मात्र या खाणीवर नेमकी कुणाची मालकी आहे आणि त्याठिकणी सापडलेल्या सोन्याचं काय होणार हा निर्णय होईपर्यंत या डोंगराचे खोदकाम थांबवण्याचे आदेश दिले गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
आदित्य ठाकरेंच्या वरळीत दिशा पटानीच्या चित्रपटाचे मध्यरात्री शुटींग झालेच कसे?, मनसेचा सवाल
रिक्षा चालकाचा ‘हा’ ठुमकेबाज डान्स तुम्ही कधीही पाहिला नसेल, पाहा व्हिडिओ
बदकाने शिकवली माणुसकी! भूकेल्या माशांना दिले स्वत:चे अन्न, व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.