“गुन्ह्याची कबुली देण्यासाठी संजय राठोड पोहरादेवीला”

यवतमाळ | पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादात सापडलेले शिवसेना मंत्री संजय राठोड आज पोहरादेवीला रवाना  झाले होते. त्यांनी पोहरादेवीमध्ये जगदंबा मातेचं दर्शन घेत पत्रकार परिषदेत निर्दोष असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

संजय राठोड हे पुजा चव्हाणने आत्महत्या केल्यापासून 15 दिवसानंतर पहिल्यांदाच समोर आले होते. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटले, ‘एका घटनेवरून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका, या प्रकरणात घाणेरडे राजकारण केलं जात आहे’. असं संजय राठोड म्हणाले.

दरम्यान भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुजा चव्हाणच्या आत्महत्येला मंत्री संजय राठोडचं जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, “पुजाच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते संजय राठोड यांना पाठिशी घालण्याचं काम करत आहे संजय राठोड हाच पुजा चव्हाणचा हत्यारा आहे”.

तसेच त्या पुढे म्हणाल्या “आरोपीला कोणतीही जात,l धर्म नसतो. गुन्ह्याची कबूली द्यायला संजय राठोड पोहरादेवीला गेले आहेत. पोलिसांकडे पुरावे असतानाही पोलिस राठोड यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही”. असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
“मंत्री संजय राठोडनेच पुजा चव्हाणची हत्या केली”
मंत्री संजय राठोडांना पत्नीची खंबीर साथ
पुजा चव्हाणसोबतच्या ‘त्या’ फोटोबद्दल संजय राठोडांनी दिले धक्कादायक स्पष्टीकरण
पुजा चव्हाण प्रकरणी संजय राठोडांनी मौन सोडले; दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.