सकाळी तक्रार आणि संध्याकाळी निर्णय, अजितदादांनी एकाच दिवसात मिळवून दिला न्याय..

बारामती । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अतिशील कामांसाठी ओळखले जातात. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार सुरू होता. यावेळी अशाच एका कामाची प्रचिती आली. यावेळी फलटण तालुक्यातील निवृत्त शिक्षकांनी जमिन फसवणुकीबाबतची तक्रार पवारांकडे आली.

पवार यांच्या सुचनेनुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून रविवारी रात्रीच या शिक्षकांची हक्काची जमिन परत मिळवून दिली. ११ शिक्षकांनी निवृत्त झाल्यावर सर्व मिळालेली आयुष्यभरची रक्कम खर्च करून बारामती शहरातील खंडोबा नगर येथे ग्रुप मध्ये ६० गुंठे जागा विकत घेतली होती.

त्यातील ४० गुंठे जागा शहरातील नामांकित तीन एजंट च्या माध्यमातून विकली. त्या तिघांनी कमिशन तर कमावले. व त्याच बरोबर फलटण ग्रुपचा विश्वास संपादित केला. पुन्हा तिघांनी २० गुंठे विकली व त्यातील १४ लाख रुपये दिले व राहिलेले १ कोटी २८ लाख ५० हजार उद्या देऊ असे सांगितले.

त्यांनी आज कायम खुश खरेदी करून द्या, असे सांगितले. पहिला व्यवहार उत्तम झाल्याने हे शिक्षक कायम खुश खरेदी करून दिले. परंतु काही तासातच त्या तिघांनी पलटी मारून आता राहिलेली रक्कम देत नसल्याचे सांगून काय करायचे ते करा , बारामती मध्ये आमचे कोण वाकडे करू शकणार नाही. अशी भूमिका घेतली.

यामुळे हे शिक्षक टेन्शनमध्ये होते, शिक्षकांनी ही गोष्ट अजित पवार यांच्या कानावर घातली, लगेच अजित पवारांनी पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना या प्रकरणात दोन्ही बाजू व सत्यता पाहून गुन्हेगार असतील त्यांना सदर रक्कम देऊन टाकण्यास सांगा अशी सूचना केली.

पोलिसांनी चौकशी करताच तिघांनी फसवणूक केल्याची कबुली त्यांनी दिली. यामुळे त्यांना त्यांची रक्कम मिळाली. यामुळे अजित पवार यांच्या कामाची प्रचिती पुन्हा एकदा सर्वांना आली. यामुळे शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

तारक मेहतामधील दयाबेनने केले होते बी-ग्रेड चित्रपटात काम; बोल्डनेसची सर्वच हद्द केली होती पार

तुम्हाला माहिती आहे का? भारतात ‘या’ नोकऱ्यांमध्ये मिळतो लाखो रुपये पगार, आकडा वाचून अवाक व्हाल

मोठी बातमी! संपत्तीसाठी भावांकडून माजी मंत्री विजय शिवतारेंचा छळ, मुलीच्या आरोपाने खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.