पुण्यातील ‘या’ मोठ्या कंपनीने चीनला कंपनी विकून १४१९ कामगारांना केले कमी

पुणे । काही दिवसांपूर्वी पुण्यातील तळेगाव येथील जनरल मोटर्स इंडिया लिमिटेडने तळेगाव औद्योगिक क्षेत्रात ऑटोमोबाईल वाहने आणि पॉवर ट्रेन इंजिन निर्मिती प्रकल्प उभारला होता. या कंपनीतील उत्पादन २० डिसेंबर २०२० रोजी थांबविण्यात आले आहे. त्यानंतर कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये वाद सुरू होता.

आता या वादावर कोणताही तोडगा न निघाल्याने कंपनीने औद्योगिक विवाद नियम १९५७ अंतर्गत १४१९ कामगारांना १६ एप्रिल २०२१ पासून कामावरून कमी केल्याचे पत्र अप्पर कामगार आयुक्तांना दिले आहे. यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

जनरल मोटर्स कंपनीने आपल्या १४१९ कामगारांना टाळेबंदीची नोटीस दिली असल्याचे कामगार आयुक्तालयाला कळवले आहे. इकोनॉमिक्स टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिले आहे. या कामगारांना एकच धक्का बसला आहे.

याबाबत जनरल मोटर्सने कामगारांना न कळवताच कंपनी २०२० मध्ये चीनच्या ग्रेट वॉल मोटर्सला कंपनी विकली. गेल्या वर्षभरापासून कामगारांना स्वेच्छा निवृत्ती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता कामबंदीची आलेली नोटीस हा दबावतंत्राचा भाग आहे, असे यावेळी कामगारांनी म्हटले आहे.

यामुळे मात्र अनेक कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. या कामगारांना भरपाई मिळवण्याचा हक्क आहे. तसेच नियमाप्रमाणे त्यांना भरपाई दिले जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले. मात्र पुढे हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

सलमानभाई माझे सगळे आयुष्य तुला मिळावे, ढसाढसा रडत असे का म्हणाली राखी? जाणून घ्या..

कंगनाने शेअर केला नैवेद्याच्या ताटाचा फोटो, ताटातील कांदा पाहून लोकांनी झापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.