‘या’ अधिकाऱ्याच्या बेनामी ३८ कंपन्या, ८२ कोटींची प्रॉपर्टी, कोण आहे हा अधिकारी, वाचा..

अनेक सरकारी अधिकारी आपल्या पदाचा गैरफायदा करून मोठी संपत्ती कमवतात. यामध्ये बंगले, गाड्या, कंपन्या, सोनं आढळून येते. मात्र एक ना एक दिवस याचा सुगावा लागतो, आणि त्यांच्यावर कारवाई केली जाते. आता नगररचना विभागाचा निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर याची मालमत्ता तब्बल ८२ कोटी ३४ लाखांची आढळून आली आहे.

त्यामुळे त्यांच्यावर तब्बल ४० हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. त्यांच्यावर नोकरीच्या काळात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. नाझीरकर यांची उत्पन्नापेक्षा तब्बल १२०० टक्के अधिक म्हणजे ८२ कोटी ३४ लाख ३४ हजार रुपयांची संपत्ती त्याने कमावली. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलीस याबाबत अजून तपास करत आहेत.

या घोटाळ्यात हनुमंत नाझिरकर याच्यासह त्याची पत्नी संगीता नाझिरकर, गीतांजली नाझिरकर, भास्कर नाझिरकर, राहूल खोमणे, अनिल शिपकुले, बाळासाहेब घनवट व विजयसिंह धुमाळ अशा आठ जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखल केले. यामुळे संपूर्ण कुटूंबच यामध्ये सहभागी आहे.

त्यापैकी हनुमंत नाझिरकर व राहूल खोमणे यांना अटक करण्यात आली आहे. ते गेली तीन महिन्यापासून येरवडा कारागृहात आहेत. नाझिरकर हा अमरावती विभागात सहसंचालक होता. अचानक त्यांची संपत्ती कशी वाढली यामुळे संशय निर्माण झाला होता.

नाझिरकर याच्या बारामतीतही मालमत्ता असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे बारामतीमध्ये देखील आता अजून चौकशी करण्यात येणार आहे. यामुळे आता अजून कुठे कुठे संपत्ती सापडणार हे लवकरच समजेल.

ताज्या बातम्या

पतीचा मोबाईल बंद असल्याने बायको गेली शोधायला, पण पुढे जे झालं ते पाहून बायको हादरली

“देशात यापूर्वीही मोठ्या प्रमाणात लसीकरण केले, पण कधी अशी चमकोगिरी केली नाही”

श्रावणबाळच! स्कूटरवरून आईला घेऊन कश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत सर्व तीर्थस्थळांना भेट दिली; नोकरीही सोडली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.