पुण्यात साधी नोकरी करणारा युवक कसा झाला ‘देवमाणूस’; नकारात्मक पात्र असूनही करतोय प्रेक्षकांच्या मनावर राज्य

‘देवमाणूस’ मालिकेला अनेक रंजक वळण आलेली पाहायला मिळाली. सध्या ही मालिका भरपूर चर्चेत आहे. मालिकेतील कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपल वेगळ स्थान निर्माण केल आहे. तसेच यातील कलाकारांना प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे.

‘देवमाणूस’ मालिकेतील मुख्य पात्र अभिनेता किरण गायकवाड साकारत आहे. तो मालिकेत डॉ. अजितकुमार देव ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे.

Kiran Gaikwad Share Post On Social Media Special Thanks To Shashank Ketkar  - भावा तू कमाल आहेस... शशांक केतकरसाठी किरण गायकवाडची खास पोस्ट |  Maharashtra Times - Maharashtra Times

किरण गायकवाडबद्दल जाणून घ्यायचे झाले तर तो मुळचा पुण्याचा आहे. त्याचा जन्म १२ जून रोजी पुण्यात झाला. पुण्यातील यशवंत मोहिते महाविद्यालयातून त्याने त्याचे शिक्षण पूर्ण केले. आधीपासूनच त्याला अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक नाटकांमध्ये भाग घेतला होता.

किरण मनोरंज सृष्टीकडे वळण्याआधी महिंद्रा कंपनीत काम करत होता. त्यानंतर तो आजारी पडला आणि त्याने नोकरी सोडून दिली. पुढे त्याने आपल्या अभिनयाकडे लक्ष देण्याच ठरवलं. आणि त्यासाठी तो एका नाटक ग्रुपमध्ये काम करू लागला.

किरण आपल्या अभिनय क्षेत्रात मेहनत करत असतानाच त्याला २०१७ साली ‘लागीर झाल जी’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्याने याच संधीच सोन केल आणि अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला.

Kiran Gaikwad in White Kurtachuridarset Outfit - Celebrity Clothing |  Charmboard

‘लागीर झालं जी’ मालिकेत किरणने ‘भैयासाहेब’ ही सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. त्याच्या भैयासाहेब या भूमिकेलादेखील चाहत्यांनी भरभरून प्रेम दिल. या भूमिकेत त्याला मुख्य नायकाएवढीच लोकप्रियता मिळाली.

Kiran Gaikwad Personalized Video Shoutout Messages | Tring India

याच मालिकेतील कामगिरीचा आढावा घेऊन त्याला ‘देवमाणूस मालिकेतील मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. किरणने देवमाणूस मालिकेत विरोधी भूमिका साकारली आहे. असे असतानाही प्रेक्षकांनी त्याच्या या कामाचे भरपूर कौतुक केलेले पाहायला मिळते.

हे ही वाचा-

दुर्दैवी! फुगे विकून घरी परतणाऱ्या बापलेकीवर काळाचा घाला; वाहनाच्या धडकेत मृत्यू

इंडिअन आयडल १२: सोनू कक्कडला शोची जज म्हणून पाहताच लोक भडकले, म्हणाले संपूर्ण कार्यक्रमातच गडबड

सावधान! रोज परफ्युम वापरत असाल तर शरीरावर होतील हे& गंभीर परिणाम, जाणून घ्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.