सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती ३० व्या वर्षी की वयाच्या ५० व्या वर्षी? सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई | ग्राम विकास विभाग आस्थापनेवरील गट-अ ते गट-ड मधील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे वयाच्या ५०/५५ वर्षापलीकडे किंवा अर्हताकारी ३० वर्षाच्या सेवेनंतर शासन सेवेत राहण्याची पात्रापात्रता आजमावण्यासाठी विभागीय पुनर्विलोकन समिती नेमण्यात आली आहे.

यामुळे सरकारी कर्मचार्याची झोप उडाली आहे. याचबरोबर सामान्य प्रशासन विभाग, दिनांक १०.०६.२०१९ च्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत वयाच्या ३५ व्या वर्षांपूर्वी आलेल्या गट -अ व गट-ब च्या राजपत्रित अधिकाऱ्यांची त्यांच्या वयाची ५० वर्षे पूर्ण किंवा त्यांच्या सेवेची ३० वर्षे यापैकी जे आधी होईल त्याचे पुनर्विलोकन करण्याबाबत सूचना देण्यात आले होते.

याचबरोबर गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या वयाच्या ५५ वर्षे किंवा सेवेची ३० वर्षे पूर्ण होतील त्यांच्यासाठी आदेश देण्यात आले होते. यासाठीच सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय सेवेची ३० वर्षे किंवा वयाची ५०/५५ ठरविण्यासाठी ग्राम विकास विभागाने समित्या नेमल्या आहेत.

दरम्यान, या दोन्ही समित्या त्यांचा अहवाल गट-अ अधिकार्यांच्या शिफारशी अंतिम निर्णयासाठी ग्राम विकास मंत्री आणि राज्यमंत्र्यांना सोपविणार आहेत. या कर्मचाऱ्यांना पुढे सेवेत ठेवायचे की नाही यावर निर्णय घेण्यासाठी दोन समित्या नेमल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
‘माझ्या कातड्याचे जोडे करून घातले तरी तुमच्या उपकाराची परतफेड होणार नाही’
दिल्ली हिंसाचारावर अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…
हिंसक आंदोलनामागे काँग्रेसचा हात असण्याची शक्यता;  गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.