हॉकीतील भारताच्या विजयाचे वर्णन करताना रडू लागले कॉमेंटेटर, पाहा भावूक करणारा ‘हा’ व्हिडिओ

मुंबई । भारतात अनेक क्रियाप्रेमी आहेत. आणि त्यांच्यासाठी सध्या टोकियोमध्ये मेजवानी सुरू आहे. टोकियो ऑलम्पिकमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. यामुळे चाहते खुश आहेत. काल भारताने एक मोठी कामगिरी केली.

टोकियो ऑलम्पिकमध्ये भारताच्या पुरुष हॉकी टीमने रविवारी इतिहास घडवला. भारताने क्वार्टर फायनलमध्ये ग्रेट ब्रिटनचा ३-१ ने पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. १९७२ नंतर पहिल्यांदाच भारतीय हॉकी टीमने ऑलम्पिक सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.

आठ वेळा ऑलम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय टीमनं ४९ वर्षांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतामध्ये ऑलम्पिक सामन्यांचे Live प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्सवर करण्यात येत आहे. सुनील तनेजा आणि सिद्धार्थ पांडेय हे दोघे जण रविवारच्या मॅचची हिंदी कॉमेंट्री करत होते.

रविवारी मॅच संपण्याची शिट्टी वाजली आणि गेल्या ४९ वर्षांपासून भारतीय हॉकी फॅन्सनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. भारताची टीम सेमी फायनलमध्ये दाखल झाली. या ऐतिहासिक क्षणी सुनील तनेजा आणि सिद्धार्थ पांडेय हे दोघे जणं अक्षरश: आनंदाने रडू लागले. या दोघांनाही Live कॉमेंट्रीचा मोठा अनुभव आहे.

त्यांनी यापूर्वी देखील अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक सामन्यांची कॉमेंट्री केली आहे. तरीही रविवारचा विजय हा त्यांच्यासाठी खूपच इमोशनल होता. भारताच्या हॉकी टीमने ४९ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध साखळी सामन्यामधे मोठा पराभव झाल्यानंतर भारत इथवर मजल मारेल अशी कल्पना खूप कमी जणांनी केली होती.

सामना जिंकल्यानंतर कॉमेंट्री करताना सुनील तनेजा आणि सिद्धार्थ पांडेय या दोघांनाही अश्रू आवरले नाहीत. त्यांच्या या इमोशनल कॉमेंट्रीचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. अनेक जण या व्हिडिओला प्रतिक्रिया देखील देत आहेत. भारतासाठी ही खरंच एक कौतुकास्पद गोष्ट आहे.

ताज्या बातम्या

पांड्या बंधूंनी मुंबईत घेतले ३० कोटींचे घर; एकेकाळी मॅगी खाऊन दिवस काढत होते

प्रेग्नंसीदरम्यान ‘हे’ नैसर्गिक पदार्थ करतील ‘ब्लीच’ म्हणून काम; पहा कशी राखायची चेहऱ्याची निगा

तुम्ही जीएसटी भरूच नका, मग ठाकरेच काय नरेंद्र मोदीही तुमच्या दारावर येतील; मोदींच्या भावाचे व्यापाऱ्यांना आवाहन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.