दिपाली चव्हाणाच्या आत्महत्या प्रकरणावर प्रकाश आंबेडकर यांनी केला खळबळजनक गौप्यस्फोट; म्हणाले…

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. आत्महत्येपुर्वी दिपाली यांनी सुसाइड नोट लिहून उप वन संरक्षक(DFO) विनोद शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

याच प्रकरणावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या मुळाशी मेळघाट आणि धारणी क्षेत्रातील वाघ आणि सागवान तस्कर असल्याचा गंभीर आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘धारणी आणि मेळघाटमधील वाघ कमी होणे, वाघाची तस्करी, सागवानाची अवैध विक्री यातूनच दिपाली यांना या साखळीनं आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे आंबेडकर म्हणालेत.

दरम्यान, यासंदर्भात आंबेडकरांनी त्यांच्याकडे पुरावे असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात आठवडाभरात सरकारनं ठोस कारवाई न केल्यास पुरावे सार्वजनिक करण्याचा इशाराही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

लॉकडाऊनची काही आवश्यक्ता नाही लॉकडाऊनच्या धमक्या देणं बंद करा; कॉंग्रेस नेत्याने सुनावले

बाॅलीवूड पुन्हा हादरले! भाजपची खासदार असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला ब्लड कॅन्सर

Video: पाहुणा बनून आहेर घेऊन पळून जायचा, लोकांच्या हाती लागला तर लोकांनी चोप चोप चोपला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.