दिलासादायक! भारत कोरोनाला हरवण्यात सक्षम; WHO च्या तज्ञांचा दावा

कोरोनाच्या लढाईत भारतासहित अनेक देश लढत आहेत. कोरोनाने भारतासह अनेक देशांत हाहाकार माजवला आहे. याचदरम्यान WHO ने कोरोनाशी लढा देण्याबाबत भारतावर विश्वास दाखवला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार अमेरिका, ब्राझील आणि भारत बलाढ्य देश आहेत. ते कोरोनाशी लढण्यात सक्षम आहेत. या देशांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी योग्य ती प्रतिकारशक्ती आहे.

अमेरिका सर्वात जास्त कोरोना पसरलेल्या देशांमधील एक आहे आणि दुसऱ्या नंबरला ब्राझील तर तिसऱ्या स्थानावर भारत आहे. रॉयटर्स टॅलीनुसार अमेरिकेत गुरुवारी कोरोनाचे ४ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

अमेरिकेत प्रत्येक तासाला २ हजार ४०० रूग्णांची नोंद होत आहे. अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे कोरोना विरुद्धच्या लढाईत खूप कौतुक केले होते. त्यांनी सांगितले व्यापक स्तरावर केल्या जाणाऱ्या टेस्टिंगमध्ये अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाकाळात भारत करत असलेल्या कामांचे कौतुक केले होते. कोरोनाविरोधात भारताने सुरुवातीपासूनच अतिदक्षता दाखवल्याचे संघटनेने सांगितले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.