कॉमेडी क्विन भारती सिंहचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

आपल्या सगळ्यांची लाडकी कॉमेडीची राणी भारती सिंगला कोण ओळखत नाही. ती आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना सतत हसवण्याचा प्रयत्न करत असते. तसेच भारती सिंग सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. ती आपल्या चाहत्यांसाठी सतत मजेदार व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते.

अलीकडेच भारतीने झोका घेतानाचा तिचा व्हिडीओ इंस्ताग्राम वर शेअर केला आहे. त्यात ती एका झोपाळ्यावर बसून झोका घेताना दिसत आहे. तो झोका एका झाडाला बांधलेला आहे आणि एक मुलगी भरतीला झोका देताना दिसते. ती मुलगी भरतीला झोका देत असता अचानक भारतीचा तोल जातो आणि ती झोक्यावरून खाली पडते.

एखादी व्यक्ती खाली पडल्यावर दुखी होईल, त्रासाने कळवळेल. परंतु भारतीने इथेही प्रसंगावधान दाखून स्वतः हसू लागली. नशिबाने भरतीला फारसे लागले नाही. उलट हा व्हिडिओ शेअर करताना भारतीने लिहिले की, नशीब मी स्वतःला सावरलं, नाहीतर माझी कंबर तर गेली….

तिच्या या पोस्टवर तिच्या क्षेत्रातील मित्रांनी त्यावर कॉमेंटकरायला सुरुवात केली. यामध्ये अनिता हसनंदानी, सुयश राय, किश्वर मर्चेंट, जरीन खान यांचा समावेश आहे. त्यांनी हसण्याच्या स्माईली, हार्टच्या स्माईली पोस्ट केल्या आहेत. यावरून असे लक्षात येते की, भारती अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून इतरांना हसवण्याचा प्रयत्न करते.

भारती सिंह बद्दल बोलायचे म्हटले तर, भारती मानाने खूप हळवी आहे. तिचे रडूही खूप जवळ आहे. भारती आणि हर्ष यांच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असते. भारती कपिल शर्मा शोमधूनही लोकांना हसवण्याचा प्रयत्न करत असते. तसेच ती आणि तिचा नवरा हर्ष  नुकताच पार पडलेला डान्स इंडिया डान्स शो होस्ट करते होते, त्यातही त्या दोघांनी प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले.

भारती सिंहचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता सोनू सुदशी बोलत असताना तिला रडू येते. भारतीने सोनूला सांगितले की, तिची आई करोना पॉझिटिव्ह झाली आहे. हे सांगताना भारती खूपच भावूक झाली होती, त्यामुळे सोनू सुद आणि नोरा फतेही यांच्या डोळ्यांतही पाणी आले.

हे ही वाचा-

निलेश लंके: एकेकाळी आमदाराच्या वशील्याने काम मिळवण्यासाठी फिरत होता, आज आहे आमदार

हा घाट दरवर्षी घेतो २०० ते ३०० लोकांचा जीव; या घाटाचा विचार करुनही अनेकांचा उडतो थरकाप

विषय गंभीर तिथं सोनू सूद खंबीर! आता कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवून वाचवले त्यांचे प्राण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.