विनोदी अभिनेते जगदीप यांचे निधन

मुंबई | बॉलीवूडमधील ज्येष्ठ नेते आणि विनोदवीर जगदीप यांचे बुधवारी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.

त्यांनी जवळपास ४०० हुन अधिक चित्रपटात काम केले आहे. विनोदाची उत्तम जाण असणारे म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी शोले चित्रपटा केलेली सुरमा भोपाली ही भूमिका आजही लोकांच्या मनात आहे.

जगदीप यांचा जन्म २९ मार्च १९३९ रोजी झाला होता. ते दतीया गावचे होते. त्यांचे पूर्ण नाव सय्यद इश्ताक अहमद जाफरी होते.

शोले, पुराना मंदिर, अंदाज अपना अपना, बिदाई, एजंट विनोद यांसारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. अजून एक अभिनेता काळाच्या पडद्याआड गेल्याने बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.