टिव्हीवरची छोटी काॅमेडीयन गंगुबाई आठवतीय? आता इतकी सुंदर दिसतेय की विश्वास बसनार नाही

अभिनय क्षेत्रात अनेक बालकलाकार खुप प्रसिद्ध आहेत. पण काही बालकलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशी एक बालकलाकार भारतात खुप प्रसिद्ध आहे. ही बालकलाकार आहे छोट्या पडद्यावरील गंगुबाई म्हणजे सलोनी दैनी.

सलोनीने खुप कमी वेळात खुप जास्त प्रसिद्धी मिळवली आहे. तिने तिच्या चुलबुल स्वभावाने आणि जबरदस्त कॉमेडीने प्रेक्षकांच्या मनात घर बनवले. सलोनीने अनेक कॉमेडी शो आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

सलोनी गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरून गायब आहे. पण तरीही सलोनीला सर्वात प्रसिद्ध बालकलाकार म्हणून ओळखली जाते. तिला आजही तिच्या गंगुबाईच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. ही तिच्या करिअरमधली सर्वात प्रसिद्ध भुमिका आहे.
जाणून घेऊया सलोनी दैनीबद्दल काही रोचक गोष्टी.

सलोनी दैनीचा जन्म मुंबईत झाला होता. सलोनीने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. अनेक मालिकांमध्ये तिने काम केले. त्यानंतर तिने काही चित्रपटांंमध्ये देखील काम केले.

असे बोलले जाते की, सलोनी दैनी इंडियन टेलिव्हिजनवरची सर्वात छोटी स्टँड अप कॉमेडीयन आहे. तिच्या अगोदर एवढ्या कमी वयातील कॉमेडीयन नव्हता. त्यामुळे ती खुप लवकर प्रसिद्ध झाली होती.

टेलिव्हिजनवर सर्वांना हसवणारी सलोनी खऱ्या आयुष्यात खुप लाजाळू आहे. तिचा हा लाजळूपणा अभिनयातून कधीच जाणवत नाही. म्हणून सलोनीने तीन वर्षांची असताना कॅमेरासमोर ऍक्ट केले होते.

सलोनी उत्तम कॉमेडीयन आहे. त्यासोबतच ती लोकांची खुप चांगली नक्कल देखील करते. अनेकदा तिने तिच्या कार्यक्रमांमध्ये राजकारणी, अभिनेते आणि अभिनेत्रींची नक्कल केली आहे. तिच्या या कौशल्यामूळे तिला मिमिक्री आर्टिस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

सलोनीने तिच्या करिअरची सुरुवात ‘कॉमेडी सर्कस महासंग्राम’ या शोमधून केली होती. या शोमध्ये तिने पहिल्यांदा गंगुबाईचे पात्र निभावले होते. तिचे हे पात्र खुप जास्त गाजले. त्यानंतर तिने अनेक कार्यक्रमांमध्ये हे पात्र निभावले होते.

तिच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याने तिला लहान वयात खुप जास्त प्रसिद्धी मिळवून दिली होती. ती लोकांमध्ये स्टार झाली होती. तिच्या निरागस स्वभावाने देखील तिला खुप जास्त।प्रसिद्धी मिळवून दिली.

अनिल कपूरसोबत नो प्रॉब्लेम या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर डेब्यु केला होता. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली. २०१६ पासून ती लाइमलाईटपासून लांब आहे. सलोनीला तिचे शिक्षण पुर्ण करायचे होते. म्हणून ती टेलिव्हिजनवर काम करणे सोडले.

सलोनी सध्या कॉलेजमध्ये तिचे शिक्षण पुर्ण करत आहे. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर ती परत एकदा अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार करत आहे. टेलिव्हिजनवरची छोटी गंगुबाई आत्ता खुप मोठी आणि सुंदर झाली आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असते.

महत्त्वाच्या बातम्या –

‘त्या’ घटनेनंतर पानाला चूना लावनारा भाऊ कदम अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनला

तुम्हाला माहीत नसेल पण शाहरूखने एकदा दोनदा नाही तर चक्क तीन वेळा लग्न केले आहे; वाचा पुर्ण किस्सा

दिवसभर काम करायचा आणि रात्री एकटा रडत बसायचा बॉलीवूडचा ‘हा’ सुपरस्टार

बाॅलीवूडचा सर्वात यशस्वी खलनायक महेश आनंदचा मृतदेह दोन दिवस सडत पडला होता..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.