१६ नोव्हेंबरपासुन सुरू होणार महाविद्यालये; युजीसीने दिला हिरवा कंदील

कोरोनाच्या संकटामुळे देशभरातील उच्च शैक्षणिक संस्था ७ महिन्यांपासून बंद आहेत. आता लॉकडाऊननंतर युजीसीने विद्यापीठे आणि महाविद्यालये पुन्हा उघडण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दिवाळीनंतर म्हणजे १६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये व शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सांगितले आहे.

यूजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार टप्प्याटप्प्याने कंटेनमेंट झोन नाहीत अशा विभागांतील महाविद्यालये सुरू करण्यात यावेत. विशेष विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये महाविद्यालयातील प्रवेशासाठी आरोग्य सेतू ॲप असणे बंधनकारक असेल.

संशोधक, पदव्युत्तर पदवी आणि अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे वर्ग पहिल्या टप्प्यात सुरू करावेत, असेही आयोगाने मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. महाविद्यालय सुरू झाले तरी विद्यार्थ्यांना स्वेच्छा उपस्थितीची परवानगी घ्यावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

पण कोणत्याही संस्थेत एकूण विद्यार्थ्यांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती असू नये असे सांगण्यात आले आहे. महाविद्यालये प्रत्यक्ष जरी सुरू झाले तरी ऑनलाइन शिक्षण विद्यापीठांनी सुरू ठेवावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. जेथे शक्य आहे, तेथे निवासी महाविद्यालयांत हॉस्टेल सुरू करण्यासही आयोगाने परवानगी दिली.

पण एका खोलीत एकाच विद्यार्थ्याला राहण्यास परवानगी द्यावी, असेही मार्गदर्शक सुचनेत सांगण्यात आले आहे. जर महाविद्यालय सुरू केल्यावर कोणत्या विद्यार्थ्याला कोरोनाची लक्षणे जाणवली तर त्याचे तातडीने विलगीकरण करण्यात येईल अशी सुविधा असावी.

…तर साष्टांग नमस्कार घालण्याचीही माझी तयारी; मराठा आरक्षणासाठी उदयनराजे मैदानात

BCG vaccine : कोरोनावर ‘ही’ लस ठरतीये परिणामकारक, श्वसनाच्या त्रासावर उपयुक्त

अरबाझसोबत घटस्फोट का घेतला? मलायकाने सांगीतली अनेक धक्कादायक कारणे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.