अखेर ठरलं! राज्यातील कॉलेज ‘या’ तारखेपासून सुरु होणार; उदय सामंत यांनी केली घोषणा

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या दिड वर्षांपासून सर्व शैक्षणिक विभाग बंद आहे. पण आता १० आणि १२ वीचा निकाल लागल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरु आहे. असे असताना विद्यार्थ्यांना महाविद्यालय कधी सुरु होणार असाही प्रश्न पडला होता.

आता लवकर महाविद्यालय सुरु होणार असल्याचे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. तसेच उदय सामंत यांनी महाविद्यालय कधी सुरु होणार याची तारीखही जाहीर केली आहे. त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी सामंत यांनी महाविद्यालय सुरु करण्याबाबत माहिती दिली आहे.

राज्यात महाविद्यालय सुरु होणार आहे. अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. राज्यात सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्य अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. म्हणूनच आता येणारे शैक्षणिक वर्ष लवकरच सुरु करण्यात येणार आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

आता येत्या १ नोव्हेंबरपासून राज्यात महाविद्यालय सुरु करण्याचा विचार सुरु आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील महाविद्यालये एकाचवेळी सुरु होतील असे नाही.

त्या भागातील कोरोना स्थिती काय आहे, याचा विचार करुन निर्णय घेतला जाईल. सोबतच नवीन शैक्षणिक वर्ष कसं असेल याबाबतही माहिती दिली जाईल, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळूनच राज्यामध्ये महाविद्यालय सरु केले जातील. तसेच संपुर्ण विद्यार्थ्यांचे लसीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय जरी घेण्यात आला असला तरी राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले असणे महत्वाचे आहे, असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘घरगुती गॅसबाबत सरकारचा नवा नियम; जर तुमच्याकडे ‘हे’ नसेल तर तुम्हाला गॅस मिळणार नाही’
काय सांगता! लाल भेंडीची लागवड करून शेतकरी झाला मालामाल, किंमत पाहून तुम्हीही थक्क व्हाल
भारतातील पहिले सेलिब्रीटी शेफ आहेत संजीव कपूर, पण इंजिनीअर किंवा डॉक्टर सोडून ते शेफ का बनले?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.