कलेक्टरने भररस्त्यात युवकाचा फोन तोडून मारली त्याच्या थोबाडीत; व्हिडीओ व्हायरल होताच कलेक्टर झाला ट्रोल

रांची | कोरोना महामारीने देशात थैमान घातले आहे. यादरम्यान डॉक्टर आणि सरकारी अधिकारी दिवस-रात्र निष्ठेने काम करत आहेत. मात्र काही मोजक्या अधिकाऱ्यांमुळे संपुर्ण सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिमा मलीन होत आहे. सध्या छत्तीसगडच्या सुरजापूरचे कलेक्टर रणबीर शर्मा यांचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हिडिओमध्ये कलेक्टर एका युवकाला स्वत: चापट मारतात आणि इतर पोलिस जवानांना विनाकारण मारहाण करायला सांगतात. व्हिडीओ रेकॉर्ड केल्याच्या संशयावरून जिल्हाधिकाऱ्यांनी युवकाचा मोबाइलही फोडला आहे. जिल्हाधिकारी रणबीर शर्माचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक कलेक्टरला निलंबित करण्यात यावे अशी मागणी करत आहेत. व्हिडिओवरून होणार्‍या गदारोळानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे.

त्याच झालं असं की, शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी स्वत: लॉकडाऊन अवलोकन करण्यासाठी गस्तीवर गेले होते. यावेळी त्यांची एका युवकाशी भेट झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला काहीतरी विचारले आणि मग त्यास जाऊ दिले. तो युवक आपल्या गाडीकडे जाऊ लागला. इतक्यात जिल्ह्याधिकाऱ्यांना काहीतरी शंका आली. मग ते तरूणाकडे वेगाने आले आणि त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. पुढे युवकाचा मोबाईल रस्त्यावर जोरात फेकला. त्यानंतर त्या युवकाला जोरात चापट मारली.

जिल्हाधिकाऱ्याच्या संतापाचा बळी पडलेला तो युवक वारंवार सांगत होता की तो कोरोना चाचणी करण्यासाठी आला आहे. परंतु जिल्हाधिकारी वेगळ्याच मनःस्थितीत होते. त्यांनी युवकाचे ऐकले नाही. मात्र, घटनेनंतर काही वेळातच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे संतप्त झालेल्या लोकांनी त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. अनेकांनी त्यांचे वेडा माणूस असे वर्णन केले आणि त्याच्या उपचाराची व्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारला विनंती केली.

महत्वाच्या बातम्या-
लग्नाच्या वाढदिवसाला भेट दिलेला एक किलो सोन्याचा हार निघाला नकली; उडाली खळबळ
दिल्लीचे नाव जोपर्यंत इंद्रप्रस्थ ठेवले जात नाही तोपर्यंत देश संकटात असेल: सुब्रमण्यम स्वामी
सोनूने सगळ्यांचा भरोसा तोडत लावला चूना, १३ जणांशी लग्न करून चिक्कार लुटलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.