नक्षलवाद्यांनी कोब्रा कमांडोला सोडण्याची घातली ही अट, त्यांचे चार साथी या हल्ल्यात ठार

 

३ एप्रिलला छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला होता, त्यामध्ये आतापर्यंत २२ जवान शहीद झाले आहे. त्यात कोब्रा टीमचे कंमाडो राकेश्वर सिंग यांना नक्षलवाद्यांनी त्यांचे अपहरण केले होते. आता नक्षलवाद्यांनी त्यांचा एक फोटो शेअर केला असून त्यांना सोडण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.

नक्षलवाद्यांनी एक पत्र पाठवले असून त्यामध्ये कमांडो पुर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. तसेच नक्षलवाद्यांनी कमांडो राकेश्वर यांचा एक फोटो सुद्धा शेअर केला असून त्यामध्ये ते एका झोपडीत बसल्याचे दिसून येत असून ते पुर्ण सुरक्षित असल्याचे दिसत आहे.

नक्षलवाद्यांनी हे पत्र बीजापूरचे पत्रकार गणेश मिश्र यांना पाठवले आहे, तसेच जवानाला सोडण्यासाठी काही अटीही ठेवल्या आहे. बुधवारी नक्षलवाद्यांनी माझ्याशी फोनवरुन संपर्क साधला होता. तेव्हा राकेश्वर आमच्या ताब्यात सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच आता पुराव्यासाठी त्यांनी राकेश्वर यांचा एक फोटोही पाठवला आहे, असे गणेश मिश्र यांनी म्हटले आहे.

बेपत्ता झाल्यानंतर राकेश्वर यांचा हा पहिलाच फोटो आहे. तसेच नक्षलवाद्यांनी पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे. आपल्याशी चर्चा करण्यासाठी सरकारने मध्यस्थांना पाठवावे, तेव्हाच राकेश्वर यांची सुटका केली जाईल. तसेच या हल्ल्यात त्यांचे चार साथी झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जम्मु काश्मीरमध्ये राहणाऱ्या राकेश्वर यांच्या कुटुंबाने सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी याचना केली आहे. सरकारने लवकरात लवकर मध्यस्थ्यांना पाठवून राकेश्वर यांची सुटका करावी असे त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.