भारतीय क्रिकेट संघाचा कोच कोण होणार? बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले ‘हे’ नाव..

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचे कोच आणि टीम इंडियाचा कर्णधार बदलण्याची चर्चा सुरू आहे. यामुळे नवीन कोच कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. टी20 वर्ल्ड कपनंतर मोठे उलटफेर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कर्णधार विराट कोहलीला वन डे आणि टी 20 च्या कर्णधार पदावरुन मुक्त करणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे सुद्धा पद सोडणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. यामुळे आता टीम इंडियाची ‘वॉल’ राहुल द्रविडचे नाव चर्चेत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनेही तसे संकेत दिले आहेत.

टी 20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांचा करार संपणार आहे. तसेच करार पुढे वाढवण्यास शास्त्री उत्सुक नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे बदल होण्याची शक्यता आहे. गांगुलीच्या म्हणण्यानुसार रवी शास्त्रींचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रविडचा प्रशिक्षक पदासाठी विचार केला जाऊ शकतो.

असे असले तरी द्रविडची पूर्णवेळ प्रशिक्षकाऐवजी हंगामी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते, अद्याप द्रविडशी याबाबत कोणतीही चर्चा केली नसल्याचे गांगुलीने स्पष्ट केले. गांगुलीच्या मते द्रविडसुद्धा पूर्णवेळ प्रशिक्षक होण्यास उत्सुक नसावा. यामुळे त्याचा अजूनही विचार केला नाही.

तसेच भारतीय संघाचे सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक असलेल्या विक्रम राठोड यांच्या नावाचाही मुख्य प्रशिक्षक पदासाठी विचार केला जाऊ शकतो. यामुळे त्यांचे देखील नाव आघाडीवर आहे. ते रवी शास्त्री यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. भारतीय संघासोबतचा त्यांचा समन्वयही चांगला आहे.

त्यांची कर्णधार विराट कोहलीशीही देखील जवळीक आहे. त्यामुळे ते सुद्धा प्रशिक्षक पदासाठी महत्त्वाचे दावेदार असू शकतात. मात्र टी-20 वर्ल्डकपनंतर या सगळ्या गोष्टी घडतील असेही सांगितले जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.