मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(CM Yogi Adityanath) यांच्या सरकारने उत्तर प्रदेश राज्यातील धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर भोंग्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. या कारवाईत आतापर्यंत ६ हजारांपेक्षा अधिक भोंगे हटवण्यात आले आहेत. तर ३० हजार भोंग्यांच्या आवाजावर मर्यादा आणण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून ही कारवाई सुरु आहे.(CM Yogi removed more than 6,000 horns in Uttar Pradesh)
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. ‘लोकांना त्यांच्या धर्माप्रमाणे उपासना करण्याचा अधिकार आहे. पण त्याचा इतरांना त्रास व्हायला नको”, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बैठकीत सांगितले होते. यानंतर पोलीस अधिकाऱ्यांकडून राज्यातील धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर भोंग्यांच्या बाबतीत मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार म्हणाले की, “धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर भोंगे हटवण्यासाठी आणि इतर भोंग्यांच्या आवाजावर न्यायालयाच्या निर्देशानुसार मर्यादा आणण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.”
अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार पुढे म्हणाले की, आतपर्यंत या मोहिमेअंतर्गत, ६०३१ भोंगे हटवण्यात आले आहेत. तसेच २९ हजार ६७४ भोंग्यांचा आवाजावर मर्यादा आणण्यात आली आहे. ही कारवाई करत असताना कोणत्याही प्रकारचा भेदाभेद करण्यात आलेला नाही”, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली आहे.
“या मोहिमेअंतर्गत बेकायदेशीर भोंग्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता हे भोंगे बसवण्यात आलेले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे”, असे देखील अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशातील मशिदींवरील भोंगे हटवल्याबद्दल राज ठाकरेंनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करणारे एक पत्रक सोशल मीडियावर शेअर केले आहे. “उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषतः मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.”, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकामध्ये लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
हिंदीची तळी उचलणाऱ्या अजय देवगनची बोलती बंद; साऊथच्या अभिनेत्याने असे झापले की…
गरीब नवऱ्याकडून इच्छा पुर्ण होत नव्हत्या, मग बायकोनं उचलला आपल्या सौंदर्याचा फायदा आणि…
..तर हिंदू – मुस्लिम एकत्र येत त्यांचा प्रयत्न हाणून पाडतील; शरद पवार ॲक्शन मोडमध्ये