..हे सहन केले जाणार नाही; बॉलीवूडमधील वादावर उद्धव ठाकरेंनी पहील्यांदाच उघडले तोंड

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणानंतर अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. त्यातले सर्वात जास्त गाजलेले प्रकरण म्हणजे ड्रगचे. ड्रग प्रकरणात बॉलीवूडच्या अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत.

त्यामूळे हे प्रकरण खुप गाजले होते. त्यासोबतच नेपोटिझमचा मुद्दा देखील खुप जास्त चर्चेत होता. बॉलीवूड कलाकारांवर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामूळे बॉलीवूडचा हा वाद चांगलाच वाढला आहे.

बॉलीवूडच्या या वादावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ‘बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रयत्न होत आहेत. ते सहन केले जाणार नाहीत’. असा इशारा त्यांनी दिला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनामूळे राज्यातील सर्व सिनेमा घर बंद आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिनेमागृहाच्या मालकांशी व्हिडिओ काँफरन्सद्वारे सवांद साधला. त्यावेळी त्यांनी बॉलीवूडच्या वादावर आपले मत मांडले.

ते म्हणाले की, मुंबई ही राज्याची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी देखील आहे. बॉलीवूड आज हॉलीवूडच्या टक्करचे सिनेमे बनवत आहे. म्हणून जगभर बॉलीवूडचा चाहतावर्ग आहे. बॉलीवूडमूळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते.

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूवडला बदनाम करण्यात येत आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रयत्न होत आहेत. ते सहन केले जाणार नाहीत’. असा इशारा त्यांनी दिला आहे’.

महत्त्वाच्या बातम्या –

एका मळक्या कपड्यातील शेतकऱ्यानं अख्ख पोलीस स्टेशन सस्पेंड केलं होतं; वाचा पुर्ण किस्सा

बाॅलीवूडचे सर्व लांडगे आता एकत्र आलेत; महीलांवर, शेतकऱ्यांवर अन्याय होतो तेव्हा हे कुठे जातात

सावधान! रात्री झोपताना उशाखाली मोबाईल ठेवल्यावे आरोग्यावर होतील गंभीर परीणाम

पतीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री मयूरी देशमुखने पहिल्यांदाच केला अनेक गोष्टींचा खुलासा

भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवणार?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.