Share

मी राजीनामा देतो, तुम्ही मुख्यमंत्री व्हा; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंना आॅफर

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.(cm uddhav thakre give offer to eknath shinde )

या प्रस्तावासोबत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर काही अटी देखील ठेवल्या आहेत. या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपद घेण्यापेक्षा मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत परत यावं आणि मुख्यमंत्री बनावं”, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत चर्चा केली आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी मी ही भूमिका घेतली होती, असे उद्धव ठाकरे यांनी बैठकीत आमदारांना सांगितले.

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे कोणत्याही पक्षासोबत जाण्यास तयार नाहीत, अशी माहिती मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करण्यास एकनाथ शिंदे यांचा नकार आहे. शिवसेनेचा अपमान होता कामा नये. शिवसेनेच्या आमदारांना योग्य वागणूक मिळाली पाहिजे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच एकनाथ शिंदे चर्चा करण्यास तयार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीचं सरकार तयार झाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला होता.

पण शिवसेनेतील काही नेत्यांचा मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध होता. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं तर शिवसेना पक्षात आणखी एक नारायण राणे निर्माण होईल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करू नये, असे शिवसेनेतील काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना सुचवले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते.

महत्वाच्या बातम्या :-
धोनी आणि पंतमुळे ‘या’ खेळाडूचं करिअर झालं उद्ध्वस्त, तरीही न खचता करतोय वकीली
नाराजी दूर करण्यात अपयश! एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? ठाकरे सरकार संकटात
‘…तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता’

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now