मंदिर आणि प्रार्थनास्थळं कधी उघडणार?  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत

मुंबई | राज्यात हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे मंदिरं कधी उघडणार? प्रार्थनास्थळं कधी उघडणार असा सवाल केला जात आहे. ‘मंदिरं सुरु करताना पूर्ण काळजी घेतली जाईल. दिवाळीनंतर नियमावली करुन मंदिरं उघडणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मंदिर कधी उघडणार? असा सवाल करत माझ्यावर टीका होतेय, करू द्या. तुमच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी टीका सहन करायला मी तयार आहे. टीका करणारे ४ दिवस करतील परंतु उद्या गंडांतर आलं तर? माझ्यावर जबाबदारी आहे, असे ठाकरे म्हणाले.

पुढे ठाकरे म्हणाले की, मंदिर उघडणारच आहोत. परंतु त्यासाठी नियमवली बनवत आहोत. मंदिरात साधारण ज्येष्ठ नागरिक जातात, त्यांनाच तर आपण वाचवत आलो आहोत. प्रत्येक धर्मस्थळात आपण तल्लीन होऊन प्रार्थना करतो, परंतु त्यामुळे संक्रमण वाढायला नको, असे ठाकरे म्हणाले.

‘कोरोनाबाबत घाबरवत नाही, मात्र सतर्क राहा, पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली तर ते सर्वांसाठी अवघड असेल, पुढिल 6 महिने सर्व नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच ‘कोरोनाच्या लढाईत मास्क हेच महत्त्वाचं शस्त्र, सर्वांनी मास्क वापरा,’ असे आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

दरम्यान, ‘युरोपात कोरोनाची लाट नाही त्सुनामी आली आहे. मात्र महाराष्ट्रात सर्वांच्या प्रयत्नाने कोरोनाच्या प्रादुर्भावाचा आलेख खाली आला,’ असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. ‘दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणं गरजेचं, असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
आणीबाणी लादणार नाही! फटाक्यांबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले ‘हे’ आवाहन
सनी देओलचे करिअर फ्लॉप करायला निघालेले महेश भट्ट स्वतःचे करोडोचे नुकसान करून बसले
बोल्ड सीन्स न देता किंवा अंगप्रदर्शन न करता फिल्म इंडस्ट्रीमध्ये राज्य करते ‘ही’ अभिनेत्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.