राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सडेतोड उत्तर; देशभरात होतेय चर्चा

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेते यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु आहे. तसेच अनेकदा राज्यपाल आणि महाविकास आघाडी नेते एकमेकांवर टीकाही करताना दिसून येतात.

अशात मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकणावरुन राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्वावर दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची सुचना राज्यपालांनी दिली आहे. आता या सुचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.
विरोधकांच्या राजकारणात सहभागी होऊ नका, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला राज्यपालांना दिला आहे. यासंबंधी उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्रही लिहीले आहे.

महिलांवरील अत्याचार, बलात्कारासारख्या घटना राज्य देश व समाजाला कलंकित करत असतात. याची जाणीव मला आहे. साकीनाक्यासारखी घटना पुन्हा घडू नये, यासाठी सरकार कठोर पावले उचलत आहे. पण महिलांवरील अत्याचार व हत्या हा राष्ट्रव्यापी विषय असून त्याची देशपातळीवर चर्चा व्हायली हवी.

गेल्या काही वर्षांमध्ये दिल्लीतील महिला अत्याचारांमध्ये कमालीची वाढ झाली. जगात दिल्लीची बदनामी झालीच व बलात्काराची राजधानी अशी नाचक्की झाली. दिल्लीची कायदा सुरक्षा हा केंद्राचा विषय आहे. हे खास नमूद करण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

या पत्रात भाजपची सत्ता असलेल्या बिहारमधील घटनेकडेही लक्ष वेधलेले आहे. खासदाराने महिला कार्यकर्त्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रामराज्यात महिला खरोखरच सुरक्षित आहे का?

उत्तर प्रदेशात एका महिला खो खो खेळाडूवर बलात्कार झाला व हत्या करण्यात आली. या सर्व प्रकरणाने देशाला हादरवून ठेवले आहे, उत्तर प्रदेशात महिलांवरील अशा प्रकारच्या अत्याचारांत वाढ होत आहे. तिथे विशेष अधिवेशन बोलावून चर्चा करावी अशी मागणी भाजपने केल्याची दिसत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

तसेच सरकार सरकारचे काम करत आहे. त्यामुळे आता विधीमंडळाचे खास अधिवेशन बोलावून चर्चा घडवण्याची आपली सुचना नवा वाद निर्माण करु शकते. सरकारविरोधी लोकांची अधिवेशनाची मागणी सुरु असतानाच राज्यपालांनी त्यांच्या सूरात सूर मिसळून तीच मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा गोव्यातील खाडीत कार कोसळून मृत्यू; पहिला चित्रपट रिलीज होण्याआधीच दुर्दैवी अंत
यापुढे किर्तनकार पद लाऊ नका! बिग बाॅसमध्ये गेल्याने शिवलीला पाटलांवर महाराज मंडळी भडकली
मुस्लिम कृष्णभक्तानं गायलं महाभारताचं टायटल सॉंग; गळ्यातून काढला शंखाचा आवाज, व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतूक कराल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.