मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरी विराजमान झाले गणपती बाप्पा; पहा देखाव्याचे सुंदर फोटो

बाप्पांच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच लागलेली होती, मग तो सामान्य माणूस असो वा सेलिब्रीटी. जसा जसा आगमनाचा दिवस येत जवळजवळ येत होता, तशी तशी गणेश भक्तांची उत्सुकताही वाढत चालली होती. अखेर आज घरोघरी बाप्पांचे आगमन झाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरीही गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या घरच्या गणपतीचे काही फोटो शेअर केले आहे. फोटोमध्ये दिसून येते की गणपती बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने घरात आकर्षक अशी सजावट केली आहे.

तसेच उद्धव ठाकरे यांच्या घरातील गणपती बाप्पांचा देखावाही अप्रतिम आहे. उद्धव ठाकरे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासोबत मिळून आरती करताना दिसत आहे.

यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही यावेळी पुजा करताना उपस्थित होते. सध्या उद्धव ठाकरे यांच्या घरच्या गणपतीची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून या गणपतीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत २५०० पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.

जेजे अमंगल आहे, ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी करतो. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरुक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वांनी एक जबाबदार नागरीक म्हणून प्रयत्न केले पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरली असली तरी कोरोनाचा पुर्णपणे धोका टळलेला नाही, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन लोकांना केले होते.

महत्वाच्या बातम्या-

माते तुला सलाम! जीव मुठीत घेऊन गर्भवती महिलेने थरमोकॉलच्या तराफ्यातून गाठलं रुग्णालय; गोंडस मुलाला दिला जन्म
एकेकाळी ‘या’ व्यक्तीची तोंडभरून स्तुती करणारी ऐश्वर्या आज ‘त्या’ व्यक्तीचा चेहरा देखील पाहत नाही कारण…
फी भरायला नव्हते पैसे, आईने ठेवले घर गहाण, पोराने IAS होऊन केले नाव..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.