नुकसानीच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी केले जागेवरच तिथल्या तिथे चेकचे वाटप

 

सोलापूर | राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण भागांतील शेतकऱ्यांचे पिकांचे तसेच गावातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

आता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेश वाटपही केले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोलापुरातील ११ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेश वाटप केले आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत माहिती गोळा करण्याचे काम होईल, त्यानंतर सरकारकडून जी मदत करणे शक्य होईल ती मदत करू, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर, तसेच मदतीचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनाही समाधान वातल्याचे काही शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

फडणवीसांनी बिहारच्या ऐवजी दिल्लीला जावं, पंतप्रधान घराबाहेर पडतील- उद्धव ठाकरे

“…तर तोंडाच्या वाफा दवडण्याचा जागतिक पुरस्कार उद्धव ठाकरेंना मिळाला असता”

‘संकटावर एकजुटीने मात करू, धीर सोडायचा नाही सरकार तुमचंय’

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.