दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले ‘हे’ आवाहन 

मुंबई | ‘आतापर्यंत कमावलेले चार दिवसांमध्ये वाहून जाऊ नये, यासाठी प्रयत्न करा. याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका, दिवाळी आणि दिवाळीनंतरचे 15 दिवस महत्वाचे असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.

आज फेसबुकच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना पुढे मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रोषणाई करा, फराळ बनवा, पण सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका असे आवाहन केले आहे. फटाके वाजवण्याचा आनंद असतो, पण धूर आणि प्रदूषण वाढतं आहे, असे ते म्हणाले.

‘कोरोनाबाबत घाबरवत नाही, मात्र सतर्क राहा, पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली तर ते सर्वांसाठी अवघड असेल, पुढिल 6 महिने सर्व नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच ‘कोरोनाच्या लढाईत मास्क हेच महत्त्वाचं शस्त्र, सर्वांनी मास्क वापरा,’ असे आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

दरम्यान, ‘युरोपात कोरोनाची लाट नाही त्सुनामी आली आहे. मात्र महाराष्ट्रात सर्वांच्या प्रयत्नाने कोरोनाच्या प्रादुर्भावाचा आलेख खाली आला,’ असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. ‘दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणं गरजेचं, असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले आहे.

मंदिरं कधी उघडणार? प्रार्थनास्थळं कधी उघडणार असा सवाल केला जात आहे. मंदिरं सुरु करताना पूर्ण काळजी घेतली जाईल. दिवाळीनंतर नियमावली करुन मंदिरं उघडणार असल्याचे ठाकरे म्हणाले. मंदिरावरुन माझ्यावर टीका केली जाते. मात्र राज्यातील लोकांसाठी आपण मंदिरं उघडायला उशीर करत आहोत. मात्र लवकरच नियमांसह मंदिरं उघडली जातील असे ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
हिंदू देवतांची चित्रे असलेले फटाके विकू नका; मुस्लिम विक्रेत्यांना दिली जातेय धमकी
सनी देओलचे करिअर फ्लॉप करायला निघालेले महेश भट्ट स्वतःचे करोडोचे नुकसान करून बसले
बोल्ड सीन्स न देता किंवा अंगप्रदर्शन न करता फिल्म इंडस्ट्रीमध्ये राज्य करते ‘ही’ अभिनेत्री
ब्लॅक चित्रपटासाठी अमिताभ बच्चनने फुकट काम केले होते; कारण ऐकल्यावर अभिमान वाटेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.