फक्त सल्ले देण्याचे उद्योग करू नका, रोज ५० डॉक्टर्स पण द्या; आनंद महींद्रांवर भडकले मुख्यमंत्री

मुंबई: राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल तब्बल 43 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी लगेच लॉकडाऊन होणार नाही असे सांगीतले. मात्र लॉकडाऊनची शक्यता नाकारलीही नाही.

यावेळी त्यांनी उद्योगपती आनंद महींद्रांवरही निशाणा साधला. काही दिवसांपुर्वी आनंद महींद्रा म्हणाले होते की मी लॉकडाऊन करू नका, आरोग्यसुविधा उभारा. त्यावर आज मुख्यमंत्री म्हणाले की, फक्त सल्ले देण्याचे उद्योग करू नका, रोज ५० डॉक्टर्स पण द्या.

पुढे जाऊन मुख्यमंत्री असेही म्हणाले की हॉस्पीटल म्हणजे फक्त फर्नीचर नाही, त्यासाठी डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफ लागतो. तो कुठून आणणार? असा बिनतोड सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

काहीही आपण लपवत नाही आणि लपवणार नाही, सत्य काय आहे ते जनतेसमोर ठेवत आहे. मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे मला व्हिलन जरी ठरवलं तरी मला चालेल. गेल्या वर्षी परिस्थिती गंभीर होती बेड्स अब्युलन्स मिळत नव्हती. असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते आनंद महींद्रा?
“उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं”, असे ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केले आहे.

‘मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात,’ असा सल्ला आनंद महिंद्रा यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या
म्हणून आमचा लॉकडाऊनला विरोध; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याने मुख्यमंत्री ठाकरेंचे टोचले कान
तर राज्यात लॉकडाऊन लागणार – उद्धव ठाकरे
मोठी बातमी! पुण्यात मिनी लॉकडाउन; बार, हॉटेल आणि रेस्टॉरंटसह पीएमपीएल बससेवा सात दिवसांसाठी बंद राहणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.