कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ करण्याचं राजकारण करू नका, लोकांचा जीव जाईल असं वागू नका

मुंबई: राज्यात कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. काल राज्यात तब्बल 43 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली.  त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी लगेच लॉकडाऊन होणार नाही असे सांगीतले. मात्र  त्यांनी लॉकडाऊनची शक्यता नाकारलीही नाही.

यावेळी ते म्हणाले की मी घाबरवण्यासाठी आलेलो नाही, मार्ग काढण्यासाठी आलो आहे, घाबरू नका. राज्यातील परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी संवाद साधत आहे. कोरोनाचा शिरकाव होऊन आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. मधल्या काळात या विषाणूला रोखण्यास आपण यशस्वी झालो होतो. लॉकडाऊनची शक्यता पूर्णपणे टळलेली नाही. लॉकडाऊन होणार का? याचं उत्तर मी आता देत नाही.

यावेळी त्यांनी कोरोना आणि लॉकडाऊनचे राजकारण करणाऱ्या विरोधकांना झापले. लॉकडाऊन करायचं का? यात राजकारण आणू नका. राजकीय पक्षाला विनंती आहे, लोकांची जीव जाईल असं वागू नका. अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

टेस्टींग वाढवत आहेत, बोलणारे बोलतात लसीकरण वाढवले पाहिजे असं केलं पाहिजे. लसीकरणात एका दिवसात 3 लाख नागरिकांना लस दिलेली आहे. 65 लाख नागरिकांना आपण लस दिली आहे. मी टिका करकत नाही पण केंद्रानं आणखी लस पुरवली पाहिजे,  अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

अमेरिका, ब्राझील, रशिया, फ्रान्समध्ये परिस्थिती गंभीर आहे. लॉकडाऊन टाळू शकतो, पण परिस्थिती बदलत चालली आहे. प्रत्येकानं ठरवलं पाहिजे मी कोरानाला हरवणार. मी पहिल्या दिवसांपासून सांगतोय तेच आहेत. अजुनही कोरोनावर मात करायची आहे.  असंही मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगीतले.

महत्वाच्या बातम्या
फक्त सल्ले देण्याचे उद्योग करू नका, रोज ५० डॉक्टर्स पण द्या; आनंद महींद्रांवर भडकले मुख्यमंत्री
मोठी बातमी! पुण्यात मिनी लॉकडाउन; बार, हॉटेल आणि रेस्टॉरंटसह पीएमपीएल बससेवा सात दिवसांसाठी बंद राहणार
देवेंद्र फडणवीसांना जशाच तसे उत्तर द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.