परीस्थीती गंभीर, लाॅकडाऊन करावा लागेल, सहकार्य करा; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे, फडणवीसांना फोन

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात कोरोनाबधितांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून वेगवेगळ्या गाईडलाईन्स आखण्यात आल्या असून काही निर्बंध सुद्धा लादण्यात आले आहे.

आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक घेतली आहे. त्यामुळे मुंबईसोबतच राज्याबाबत एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाऊन होण्याची शक्यता सुद्धा आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात परिस्थिती खूप गंभीर आहे, त्यामुळे काही निर्बंध कडक करावे लागतील, त्यामुळे तुम्ही सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना म्हटले आहे.

तसेच या फोनवर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा प्रतिसाद दिला आहे. आवश्यक उपाययोजनांना आम्ही सहकार्य करू, आम्हाला कोरोनाबाबत राजकारणापेक्षा जनतेचे हित कायम महत्वाचे राहिले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तसेच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पण फोन केल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या परिस्थितीमुळे लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, त्यामुळे सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करून म्हटले आहे.

त्यावर आता मनसेने प्रसिसाद दिला आहे. आपण सर्वांनी सरकारी सूचनांचे पालन करावे, सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मनसेने केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.