VIDEO: नितीन गडकरींचा ताफा पुढे जाताच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा अधिकारी अन् एसपींमध्ये हाणामारी

केंद्रीय रस्ते आणि परीवहनमंत्री नितीन गडकरी काल हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री जयराम ठाकूर कुल्लु विमानतळावर उपस्थित होते. पण नितीन गडकरींचा ताफा पुढे सरकताच त्या ठिकाणी एक विचित्र घटना घडली आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे सुरक्षा अधिकारी आणि कुल्लुचे एसपी यांच्यामध्ये जोरदार झडत बघायला मिळाली आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी कुल्लुच्या एसपींना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. तसेच या संबंधित घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा रक्षक आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झालेली दिसून येत आहे. यामध्ये सुरक्षा रक्षक एसपींना लाथा बुक्क्यांनी हाणताना दिसत आहे. त्यावेळी इतर पोलिस अधिकारी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

संबंधित प्रकार तिथल्या स्थानिक नागरीकांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. तसेच एसपी साहेबांना का मारहाण करत आहे? असा सवालही काही नागरीक करताना दिसून येत आहे. हा सर्व प्रकार अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे.

विशेष म्हणजे हा सर्वप्रकार मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासमोर घडला आहे. एसपी गौरव सिंग यांनी एएसपी बृजेश सुद यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर सुद यांनी गौरव सिंग यांच्यावर लाथा बुक्क्यांनी हल्ला केला आहे.

केंद्रीय मंत्र्यांचे दौऱ्यावर असताना असा प्रकार घडल्याने त्यांच्यावर टिका केली जात आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच हिमाचल प्रदेशचे पोलिस महासंचालक शिमला येथुन कुल्लुच्या दिशेने रवाना झाले होते.

महत्वाच्या बातम्या-

तारक मेहताच्या चाहत्यांना धक्का, नट्टू काकांना झालाय कॅन्सर, ‘ही’ आहे त्यांची शेवटची इच्छा
काय म्हणावं हिला! 264 झूम मिटिंगला महिलेनं घातलं एकच शर्ट, स्वतः केला गोष्टीचा खुलासा
मुंबईच्या रुग्णालयाचा भोंगळ कारभार! आयसीयुमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला उंदराने कुरतडले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.