“मुख्यमंत्री बदलून पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नाही, म्हणून मुख्यमंत्री नाही पंतप्रधान बदला”

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी विधानसभेच्या एका वर्षाआधीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री पदावर भूपेंद्र पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भूपेंद्र पटेल हे घाटलोदिया मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहे.

भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने आता पाटीदार समाजाकडे गुजरातचे मुख्यमंत्री पद गेले आहे. भाजपाने त्यांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये गेल्या सहा महिन्यात पाच मुख्यमंत्री बदलण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसने ट्विटरवर एक मोहिम सुरु केली आहे. #CM_नहींPM बदलो, अशी मोहिम सुरु केली आहे. या मोहिमे अंतर्गत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अपयश अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच भाजप सर्व ठिकाणी आणि सर्व राज्यांमध्ये अपयशी राहीली आहे. भाजपाने संपुर्ण भारतालाच अपयशी ठरवलं आहे. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नाही, असा टोलाही काँग्रेसने यावेळी लगावला आहे.

कोरोना काळात मोदी सरकार पुर्णपणे अपयशी ठरलं आहे. आपल्या लोकांचं आधी लसीकरण करुन घेऊन कोरोनाच्या संकटावर मात करणे सर्वात खात्रीशीर उपाय आहे, एवढी साधीशी गोष्ट मोदी सरकारला का कळली नाही? असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला आहे.

मोदी सरकारला आपलं अपयश लपवण्याऐवजी ते स्वीकारण्याची भुमिका कधी घेणार? श्रेय स्वत:ने घ्यायचं आणि दोष दुसऱ्याला द्यायचा. हाच मोदींचा मंत्र आहे, असेही काँग्रेसने एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, भाजपने गेल्या सहा महिन्यात पाच मुख्यमंत्री बदलले आहे. उत्तरखंड, आसाम, कर्नाटक आणि आता गुजरात अशा राज्यात आतापर्यंत भाजपने आपले मुख्यमंत्री बदलले आहे. त्यामुळे सध्या सीएम नाही तर पीएम बदला अशी मोहिम काँग्रेसने सुरु केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

अबब! तब्बल २४ वर्षांनंतर लिफ्टचे दरवाजे उघडले, आत काय आहे पाहून सर्वांचेच धाबे दणाणले…
साकीनाका रेप केस: निलम गोऱ्हे थेट वर्षावर दाखल; मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ सल्ला
सूनेने केली सासूला जबर मारहाण, मुलगा बघतच राहीला; सूनेच्या या घाणेरड्या कृत्यावर नेटकरी संतापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.