मुख्यमंत्र्यांनी वचन पाळले! ऑलिम्पीक विजेत्यांसाठी स्वत: जेवन बनवत, स्वतःच्या हाताने जेऊ घातले

अमृतसर: मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गेल्या महिन्यात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या आणि पदके जिंकणाऱ्या पंजाबच्या खेळाडूंना वचन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार वितरण समारंभात सांगितले होते की, ते पदक विजेत्यांसाठी रात्रीचे जेवण स्वतःच्या हातांनी तयार करतील.

कॅप्टन बुधवारी आपले वचन पाळताना दिसले. भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या नीरज चोप्रा आणि भारतीय पुरुष हॉकी संघातील खेळाडूंसाठी त्यांनी पुलाव, चिकन, बटाटा आणि जर्दा भात तयार केला.

 

मुख्यमंत्र्यांनी सिसवान फार्म हाऊसमध्ये या शाही डिनरचे आयोजन केले. ते पूर्णपणे एका शेफच्या रूपात दिसत होते. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग पदक विजेत्यांना स्वताच्या हाताने वाढतही होते.

सत्कार समारंभात कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले होते की, ते खवय्ये नसले तरी त्यांना पाहुण्यांसाठी स्वयंपाक करायला आवडते. अमरिंदर यांनी सोशल मीडियाच्या त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक फोटो अपलोड केला आहे ज्यात ते रात्रीचे जेवण तयार करताना दिसत आहेत.

यापूर्वी, मुख्यमंत्र्यांनी ऑलिम्पिक (टोकियो 2020) पदक विजेते आणि क्रीडा स्पर्धांच्या महाकुंभात सहभागी झालेल्या खेळाडूंना 32 कोटींहून अधिक बक्षीस रक्कम वितरित केली होती. गोल्डन बॉय नीरज चोप्रा त्या सत्कार समारंभाला उपस्थित नव्हता.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यातील 11 हॉकीपटूंना एक ते 2.51 कोटी रुपयांची बक्षिसे दिली. भारतीय पुरुष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.