Share

Eknath Shinde : लाडू तुला, पेढे मला.. पळा पळा..! एकनाथ शिंदेंच्या सभास्थळी झालेल्या पळवापळवीने प्रचंड नाचक्की

Eknath Shinde

Eknath Shinde : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. गणेशोत्सवाच्या काळातही मुख्यमंत्र्यांनी विविध गणेश मंडळांना भेटी देत आपला जनसंपर्क मजबूत केल्याच्या चर्चा आहेत. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही विशेष मोहीम राबवली आहे.

यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (१२ सप्टेंबर) औरंगाबाद दौऱ्यावर असून पैठणमध्ये त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्याठिकाणी एक अजब प्रकार पाहायला मिळाला. तसेच एका व्हायरल व्हिडीओमुळे ही सभा चांगलीच चर्चेत आली आहे.

त्याचं झालं असं की, औरंगाबादमधील बिडकीन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पेढ्यांनी तुला करण्यात येणार होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी ही ‘पेढे तुला’ करण्यास नकार दिला. त्यांनतर ते तेथून नघून गेले. मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवताच तिथे उपस्थित नागरिकांची एकच गर्दी जमली.

https://twitter.com/BodkheShilpa/status/1569310074786676743?t=J4SAXiVDOZZLs4UuCyBb0A&s=19

नागरिकांनी तराजूत ठेवलेले लाडू आणि पेढ्यांचे डबे पळवून नेण्यास सुरुवात केली. अवघ्या काही सेकंदात जवळपास १०० किलो लाडू व पेढे लोकांनी पळवून नेले. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी ही सभा आयोजित केली होती. संदीपान भुमरे यांनी या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. यासंबंधी एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती.

मात्र, संदीपान भुमरे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. शिवसेनेने केलेल्या या टीकेला सभेमध्ये प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तसेच उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकाही करण्यात आल्या आहेत. या सभेला भाजप नेते रावसाहेब दानवे, भागवत कराड आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या
Panjabrao Dakh : पंजाबराव डखांनी सांगीतला हवामानाचा नवीन अंदाज; पुढील ४ दिवसांत ‘या’ जिल्ह्यात होणार तुफान पाऊस
Chandrashekhar Bawankule : ‘कल्याण लोकसभेसाठी शिंदे गटावर अवलंबून राहून चालणार नाही’; बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदेंच्या पोटात गोळा
Snakebite : झोपेत साप चावल्याने एकाच घरातील दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
T20 world cup : अखेर BCCI ने जाहीर केला टी-२० साठी भारतीय संघ; वाचा कोणत्या खेळाडूला मिळाली संधी

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now