रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या वादाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. या युध्दाच्या पार्श्वभुमीवर भारतातील खाद्य तेलांचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. सध्या तेलांचे भाव बघता क्विंटलमागे एक हजार रुपये वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट चांगलेच ढासळले आहे.
आधीच पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे जनतेच्या तोंडचे पाणी पळाले होते. यातच आता खाद्यतेलांच्या किंमती वाढल्यामुळे नागरिकांनी तर डोक्याला हात लावला आहे. मुख्य म्हणजे, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे सरकारला १ लाख कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याची शक्यता एसबीआयच्या आर्थिक संशोधन विभागाच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
आजचे तेलाचे भाव बघता सोयाबीन तेल 163 रु, पामतेल 155 रु, सूर्यफूल तेल 170 रु, शेंगदाणा तेल 177 रुपयांवर आले आहे. जर कच्च्या तेलांचे भाव 90 डॉलर्सपार गेले तर पुढच्या वर्षभरात सरकारचा महसूल 95 हजार कोटी ते 1 लाख कोटींनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतातील तब्बल जवळपास 70 टक्के सूर्यफूल तेल युक्रेनमधून आयात केले जाते. परंतु सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्ष सुरू असल्यामुळे तेलांच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे. अचानक तेलांच्या किंमती वाढल्यामुळे व्यापऱ्यांना देखील फटका बसला आहे. दुसऱ्या बाजुला काही भागात तेलाची साठेबाजी झाल्यामुळे खाद्यतेलाचे भाव वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे.
यासंबंधीत माहिती देताना SBI च्या आर्थिक संशोधन शाखेच्या अहवालात म्हटले आहे की, हे भाव असेच वाढत गेले तर 2022-23 मध्ये 95,000 कोटी रुपयांपासून ते 1 लाख कोटी रुपयांचा महसूली तोटा होऊ शकतो.
तसेच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्याने 2023 च्या आर्थिक वर्षात केंद्राला एकूण 92,000 कोटी रुपयांचा महसूली तोटा सहन करावा लागणार असल्याचे रेटिंग एजन्सी ICRA ने म्हटले आहे. दरम्यान रशिया आणि युक्रेन याच्यांतील वादाचा तोटा भारताला सहन करावा लागत आहे. हे जर असेच सुरु राहिले तर भारताचे आर्थिक बजट ढासळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
पेट्रोल, डिझेलनंतर खाद्यतेलांचे भाव गगनाला भिडले; आजचे भाव वाचून तुमचेही डोके चक्रावेल
भर पत्रकार परिषदेत ‘या’ प्रश्नावर अजितदादा भडकले; “आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात”
‘या’ अभिनेत्याच्या सांगण्यावरून श्रीदेवीने बोनी कपूर यांना बांधली होती राखी, नंतर त्यांच्याशीच केलं लग्न
रशिया-युक्रेन युद्धामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर ताण, पेट्रोल डिझेलनंतर खाद्यतेलांचे भाव कडाडले