बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक, बँकेला तब्बल ३६५० कोटींचा लागला चूना

नवी दिल्ली | बँकिंग क्षेत्रातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिटी बँकेकडून झालेल्या त्या एका चूकीने बँकेला ३६५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही चूकीला बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक असल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकेच्या दिग्गज बँकांच्या यादीतील एक मोठे नाव असलेल्या सिटी बँकेकडून चूक झाली आहे. याबाबत अमेरिकेच्या कोर्टांने निकाल दिला यानुसार बँक ही रक्कम वसूल करु शकत नाही. एका इंग्रजी रिपोर्टनुसार, कॉस्मेटीक कंपनी रेवलॉनला सिटी बँकेने चुकून ३६५० कोटी ट्रन्सफर झाले. बँकेच्या एका अधिकाऱ्याकडून ही चूक झाली होती. कंपनीला ट्रन्सफर झालेली ही रक्कम अद्याप बँकेला परत घेता आली नाही. धक्कादायक बाब म्हणजे कंपनी देखील हे पैसे परत करण्यास नकार दिला आहे.

कंपनीने चूकुन ट्रन्सफर झालेले पैसे परत करण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत अखेर हे प्रकरण कोर्टात गेले. तब्बल चार वर्षांपासून प्रकरण कोर्टात सुरू आहे. मात्र कोर्टाने बँक क्षेत्रात अनेक घोटाळे झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. पण अशी चूक कुठल्याही बँकेकडून झाली नसल्याचे म्हटले आहे. तसेच कोर्टाने या चुकीला बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले आहे.

नेमके प्रकरण काय आहे?
२०१६ मध्ये सिटी बँकेने कॉस्मेटीक कंपनी रेवलॉनला १.८ मिलियन डॉलरचे कर्ज दिले. कंपनीच्या बाँडच्या आधारे हे कर्ज दिले होते. परंतु सॉफ्टवेअरच्या एररमुळे कंपनीला ५०० मिलियन डॉलर म्हणजे ३६५० रक्कम जास्तीची ट्रन्सफर झाली. स्वॉफ्टवेरच्या तंत्रिक बिघाडामुळे असे झाल्याचे स्पष्टीकरण बँकेने दिले आहे. याप्रकरणी कोर्टाने दिलेल्या निकालावर बँकेने असहमती दर्शवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X का लिहिलेले असते? आयएएस मुलाखतीत विचारलेला प्रश्न
कडक सॅल्युट! एकेकाळी बांगड्या विकणारा ‘हा’ दिव्यांग तरुण बनला कलेक्टर
शाहरूख खान प्रिती झिंटाच्या किंग्स पंजाबकडून खेळणार
सलमानसोबत ब्रेकअप करणे ऐश्वर्याला पडले होते चांगलेच महागात; करिअर झाले होते खराब

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.