‘सीआयडी’ मालिकेतील एसीपी प्रद्युम्न यांचे मानधन ऐकून तुम्हाला येऊ शकते चक्कर

इंडियन टेलिव्हिजनवर अशा अनेक मालिका आहेत. ज्या संपून अनेक वर्षे झाली तरी प्रेक्षक त्या मालिकेला विसरू शकत नाहीत. अशीच एक मालिका सोनी हिंदीवर सुरू होती. या मालिकेने एक दोन वर्षे नाही तर तब्बल वीस वर्षे लोकांचे मनोरंजन केले.

ही मालिका होती ‘सीआयडी’. ही मालिका टेलिव्हिजनवरच्या सर्वात जास्त चालणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेची सुरुवात १९९८ मध्ये झाली होती आणि २०१८ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण जेवढे दिवस ही मालिका सुरू होती. तेवढे दिवस या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.

या मालिकेतील दया, अभिजित, डॉ.साळुंखे आणि एसीपी प्रद्युम्न ही सर्व पात्र खुप जास्त प्रसिद्ध आहेत. आजही लोक या पात्रांची आठवण काढत असतात आणि यांचे डायलॉग म्हणत असतात. जसे की एसीपी प्रद्युम्नचा ‘कुछ तो गडबड है’ आणि ‘दया तोड दो दरवाजा’. हे डायलॉग आजही घराघरात बोलले जातात.

अभिनेते शिवाजी साटम यांनी एसीपी प्रद्युम्नची भुमिका निभावली होती. या भुमिकेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली होती. एवढेच नाही तर या भुमिकेने त्यांना प्रसिद्धीसोबतच पैसा देखील मिळवून दिला आहे.

शिवाजी साटम यांनी सीआयडी मालिकेत सर्वात महत्त्वाची भुमिका निभावली होती. ते ही मालिका सुरु झाल्यापासून या मालिकेशी जोडलेले आहेत. त्यांनी कधीच ही मालिका सोडून जाण्याचा विचार केला नाही. त्यामागेही एक कारण आहे.

शिवाजी साटम अनेक वर्षे अभिनय क्षेत्रात नाव कमवण्यासाठी मेहनत करत होते. त्यांना काम मिळत होते. पण प्रसिद्धी मिळत नव्हती. ती प्रसिद्धी सीआयडी मालिकेने मिळवून दिली. म्हणून ते कधीच या मालिकेपासून दुर गेले नाहीत.

शिवाजी साटम यांना या मालिकेसाठी मानधन देखील तसेच मिळत होते. ते महिन्यात पंधरा दिवस या मालिकेचे शुटिंग करायचे. तर पंधरा दिवस चित्रपटांसाठी शुटिंग करायचे. त्यामूळे त्यांना कधीही या मालिकेचा अडथळा झाला नाही.

शिवाजी साटम यांना या मालिकेच्या एका भागासाठी दोन लाख रुपये मानधन मिळायचे. टेलिव्हिजनवर कलाकारांना शिफ्टनुसार काम करावे लागते. त्या प्रमाणेच त्यांना पैसे दिले जातात. तुम्ही जास्त वेळ काम केले तर त्याचे देखील पैसे मिळतात.

सीआयडी मालिका अनेक वर्षे टेलिव्हिजनवर चालली. त्यामूळे आजही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. पैसे असो किंवा प्रसिद्धी टेलिव्हिजन आजकाल बॉलीवूडला देखील चांगलीच टक्कर देत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘ह्या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतील खतरनाक व्हिलन संस्कार पंडीत आठवतोय का?

बिग ब्रेकींग! NCB ने बाॅलीवूड ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपीला मुद्देमालासह केली अटक

अकाली दल, शिवसेना हे एनडीएचे महत्वाचे आणि शेवटचे स्तंभ होते- संजय राऊत

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.